Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'तलवार बाळगणे म्हणजे प्रतिबंधित शस्त्र नव्हे'! कोर्टाने केली दोन आरोपींची सुटका; पोलिसांचे फेटाळले आरोप

Baga Sword Case: तलवार बाळगणे व सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करण्याच्या आरोपाखाली पकूलेल्या राहुल डायस (३३) व विश्वास गोवेकर (३६) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: तलवार बाळगणे व सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करण्याच्या आरोपाखाली पकूलेल्या राहुल डायस (३३) व विश्वास गोवेकर (३६) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

दोन्ही आरोपींवर (Accused) भारतीय शस्त्रास्त्र कायदा १९५९ मधील कलम ७ व कलम २५ नुसार आरोप ठेवण्यात आले होते. २८ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे सुमारे २ वाजता बागा डेक रेस्टॉरंटजवळ दोघे तलवारीसह ‘न्यूझन्स’ निर्माण करीत होते, असे पोलिसांचे म्हणणे होते.

न्यायालयाचे निरिक्षण

मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी आपल्या आदेशात तलवार हे 'धारदार' आणि 'घातक शस्त्र' असले तरी, ते 'आर्म्स ॲक्ट'नुसार 'प्रतिबंधित शस्त्र' ठरत नाही, असे निरीक्षण नोंदविले. या कायद्यानुसार 'प्रतिबंधित शस्त्रांची' व्याख्या केंद्र सरकारने अधिकृत राजपत्राद्वारे अधिसूचित केलेल्या विशिष्ट शस्त्रापुरतीच मर्यादित आहे.

न्यायालयाने नमूद केले की, तलवार हे 'प्रतिबंधित शस्त्र' घोषित करणारी कोणतीही केंद्र सरकारची अधिसूचना सरकारी पक्षाला सादर करता आली नाही. तसेच, 'आर्म्स नियम, २०१६' मध्येही तलवारीचा समावेश 'प्रतिबंधित शस्त्रां'च्या यादीत केलेला नाही.

तलवारीचा वापर कोणावरही हल्ला करण्यासाठी करण्यात आला नव्हता. तलवार केवळ 'हवेत फिरवणे' एवढाच आरोप होता. उपलब्ध पुरावा 'आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसा नाही' असे मानून न्यायालयाने (Court) दोन्ही आरोपींना मुक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील खेड्यापाड्यात, दुर्गम भागात पोहोचणार स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट; CM सावंतांची इलॉन मस्कच्या कंपनीसोबत चर्चा

VIDEO: 14 षटकार, 9 चौकार... वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! आशिया कपमध्ये 171 धावांची तुफानी खेळी

Goa Crime: विवाहीत असून जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीशी केलं लग्न, मुख्य आरोपीसह आई व दोन नातेवाईक अडकले; कोर्टाकडून आरोप निश्चित

Omkar Elephant: 'ओंकार'चं रौद्ररुप! वन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत बैलाचा बळी, दावणीला बांधलेल्या बैलाला हत्तीने चिरडले

प्रँक राजकारण! गोंयकारांना फसवल्याचा सरदेसाई - परबांचा एकमेकांवर आरोप Watch Videos

SCROLL FOR NEXT