Goan News Dainik Gomantak
गोवा

Goan News: कुठ्ठाळी ग्रामसभेत कचरा तापला!

Goan News: कुठ्ठाळीत नवीन बांधलेल्या बाजार संकुल आणि कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठीच्या जागेचा अहवालात कुठेच उल्लेख केलेला नव्हता.

दैनिक गोमन्तक

Goan News: कुठ्ठाळी ग्रामसभेत काल गत सभेच्या अहवालावरून गरमागरम चर्चा झाली. मुद्दा होता कुठ्ठाळीत नवीन बांधलेल्या बाजार संकुल व कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठीच्या जागेचा. हे दोन्ही विषय महत्त्वाचे असतानाही त्यांचा अहवालात कुठेच उल्लेख केलेला नव्हता. शेवटी सरपंच सेनिया परेरा यांनी हस्तक्षेप करून सहा नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संबंधित अहवालाला मान्यता देण्यात आली. (Goan News)

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर सरपंच सेनिया परेरा, कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, उपसरपंच दिव्या रायकर, पंच उज्ज्वला नाईक, एदुसियाना रॉड्रिग्स, रुएला फर्नांडिस, आंजेला फुर्तादो, ओलिंडा लोबो, मेल्बीनो वाझ, मॅन्युएल सिल्वा, फ्रान्सिस फर्नांडिस, मायकल डिसा आणि सचिव कृष्णा गावडे उपस्थित होते.

यावेळी जैवविविधता व्यवस्थापन समिती तसेच ग्रामविकास समितीची निवड, बाजारातील दुकानांचे वाटप, या विषयांवर चर्चा करण्यात आली.

'त्या' गॅरेजचा वाहतुकीला अडथळा

पाजेंतार येथे राष्ट्रीय महामार्गालगत थाटलेल्या गॅरेजमुळे वाहनचालकांची बरीच गैरसोय होत आहे. कुठ्ठाळीत होणारे बेकायदेशीर घर बांधकाम, ट्रेड परवाना, बेशिस्तपणे उभी करण्यात येणारी वेर्णा तिठ्यावरील वाहने, कचरा समस्या, कचरा शुल्क, दंड वसूल करण्यात आलेले अपयश या विषयांवर चर्चा झाली.

दुकाने वितरणाअभावी महसूल घटला

बाजार संकुलातील वितरित न केलेल्या दुकानांमुळे पंचायतीला महसुलावर पाणी सोडावे लागते. वकिलामार्फत लढविण्यात येणारे खटले व वकिलांचे भरमसाट शुल्क या विषयावर गांभीर्याने विचार करावा, अशा सूचना पंचसदस्य आनाक्लेत रॉड्रिग्स, ॲड. टाॅमी कार्व्हालो यांनी केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT