Mask mandatory  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: निष्काळजी नको, मास्क अनिवार्य

तज्ज्ञ समिती: राज्यात इतर निर्बंधांची गरज नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: दिल्ली, हरियाणा, केरळ आणि महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर गोवा राज्यात कोरोनाबाबत इतर निर्बंधांची आवश्यकता नाही. मात्र, कोरोनाबाबत ढिलाई नको. मास्क अनिवार्य करून आवश्यक ती काळजी घ्या असे आवाहन करण्याची सूचना तज्ज्ञ समितीच्या बैठकीत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाबाबत देश पातळीवरची आढावा बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी राज्य सरकारने कोरोना तज्ज्ञ समितीची बैठक बोलावली होती. आरोग्य सचिव रवी धवन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्यासह अनेक वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.

समितीच्या सुचना

मास्क ऐच्छिक न करता अनिवार्य करावेत, पात्र वयोगटातील विशेषता मुलांमधील लसीकरण वाढवावे, विविध आजाराने आजारी असणारे, वयोवृद्ध आणि जोखमीच्या लोकांना कोरोनाचा तिसरा डोस लवकर द्यावा, लसीकरण न घेतलेल्यांना लस घेण्याचे आवाहन करावे, मास्कबंदीचा निर्णय जून-जुलैमध्ये आढावा घेऊन घेतला जाईल.

रुग्णालयांत मास्कशिवाय प्रवेश नाही

राज्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. काही खासगी डॉक्टर यासाठी आग्रही भूमिकेत आहेत. त्यामुळे रुग्णालयात जाताना सर्वांनी मास्क घालूनच जावे. चुकून एखाद्या रुग्णाने मास्क वापरला नसेल तर त्याला डॉक्टरांकडून प्रवेश दिला जात नाही. कोविडचा संसर्ग कमी झाला असला तरी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू नसल्याने मृत्यूचा आकडा 3,832 कायम आहे.

नवे बाधित - 03

सक्रिय रुग्ण - 26

नागरिकांना कोरोनाची बाधा -2,45,388

रुग्ण आतापर्यंत बरे झाले -2,41,530

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण -98.43%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT