Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: दिलासा! राज्यात दिवसभरात नवीन रूग्णापेक्षा दुप्पट कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

राज्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेतली जात आहे.

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्यात मागील काही दिवसांपासून दोन ते तीन अंकी कोरोनाबाधित रूग्णांची वाढ होत आहे. वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच, राज्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, शनिवारी (दि.15) राज्यात नव्याने वाढ झालेल्या कोरोना बाधित रूग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने सायंकाळी राज्यातील कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार, राज्यात शनिवारी 369 नमुने तापासण्यात आले, त्यापैकी 31 सकारात्मक आले आहेत. तर, दिवसभरात 63 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज नव्याने कोणताही कोरोना रूग्ण दगावलेला नाही.

राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 98.21 टक्के एवढा आहे. सध्याच्या घडीला राज्यात 658 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गोव्यात आजवर 02 लाख 61 हजार 495 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी 02 लाख 56 हजार 823 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजवर 4 हजार 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात 53,720 सक्रिय कोरोना रूग्ण

देशातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या देखील वाढली असून, ती सध्या 53,720 एवढी आहे. गेल्या 24 तासांत 10,753 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 6,628 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 98.69 टक्के एवढा आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आजवर तब्बल 92.38 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT