Corona Update  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने, शनिवारी केवळ एक नवीन रूग्ण

मागील जवळपास दोन महिन्यांपासून गोव्यातील कोरोनाचा आलेख उतरता आहे.

Pramod Yadav

Goa Corona Update: गोव्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नव्यानं वाढ होणारी रूग्णसंख्या कमी झाल्याने राज्यातील सक्रिय रूग्णसंख्या देखील कमी झाली आहे. शनिवारी राज्यात 407 नमूने तपासण्यात आले, त्यापैकी एकच रूग्णाची चाचणी सकारात्मक झाली आहे. तसेच, काल दिवसभरात चार कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गोवा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात सध्याच्या घडीला 20 कोरोनाबाधित रूग्णांवर (Active Corona Cases In Goa) उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 2 लाख 59 हजार 036 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 55 हजार 3 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजवर 4,013 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.44 टक्के एवढा झाला आहे.

मागील जवळपास दोन महिन्यांपासून गोव्यातील कोरोनाचा आलेख उतरता आहे. नव्याने वाढ होणाऱ्या रूग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून, सक्रिय रूग्णसंख्या देखील कमी झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेलं लसीकरण आणि जागृकता यामुळे राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे.

दरम्यान, देशातील दोखील कोरोना संसर्गाचे प्रमाण घटले असून, देशात सध्याच्या घडीला 4,597 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT