Corgao Panchayat Dainik Gomantak
गोवा

Corgao Panchayat: 4 वर्षांत 6 सरपंच! कोरगाव ग्रामपंचायतीत 'संगीत खुर्ची'चा खेळ सुरूच; कल्पिता कलशावकर बिनविरोध सरपंच

Corgao Sarpanch Election: कोरगावात सरपंचपदाचा संगीत खुर्चीचा खेळ सुरूच असून, शुक्रवारी कल्पिता कल्पेश कलशावकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: कोरगावात सरपंचपदाचा संगीत खुर्चीचा खेळ सुरूच असून, शुक्रवारी कल्पिता कल्पेश कलशावकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. गेल्या चार वर्षांतील त्या सहाव्या सरपंच आहेत.

नऊ सदस्य असलेल्या या पंचायत मंडळातील सहा सदस्य सरपंच निवडीच्या बैठकीस उपस्थित होते. तीन सदस्य गैरहजर राहिले. समीर भाटलेकर, देविदास नागवेकर, दिवाकर जाधव, लौकिक शेटये, उमेश चारी आणि कल्पिता कलशावकर हे उपस्थित होते. अनुराधा कोरगावकर, नीता नर्से आणि अब्दुल नाईक हे गैरहजर होते.

अलिखित करारानुसार आतापर्यंत समीर भाटलेकर, अनुराधा कोरगावकर, अब्दुल करीम नाईक, नीता नर्से आणि देविदास नागवेकर यांनी सरपंचपद भूषविले आहे. निवडून आलेल्या पंचायत मंडळाने यापूर्वी आपला गट भाजपचा असल्याचे जाहीर केले होते.

मध्यंतरी, आम्ही भाजपचे असलो तरी आमदार प्रवीण आर्लेकर यांचे नाही, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर शिष्टाई करून आर्लेकर यांनी आठ सदस्यांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले होते. मात्र, आता नऊपैकी तीन सदस्य गैरहजर राहिल्याने गावात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

SCROLL FOR NEXT