No Tobacco Dainik Gomantak
गोवा

Goa: तंबाखू नियंत्रणासाठी समन्वय समितीची बैठक संपन्न

दक्षिण गोव्यातील (Goa)सर्व रेल्वे स्थानकांवर (Railway Station) कोतपा नियमन 4 खाली सर्व खबरदारी घेण्याचे आदेश दिले. अशी मडगाव रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक यांनी माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: दक्षिण गोवा जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक हल्लीच जिल्हाधिकारी कचेरीत संपन्न झाली. या बैठकीत तंबाखू सेवन नियंत्रणासाठी आणण्यासाठी उपाययोजनांवर विचार व चर्चा करण्यात आली. दक्षिण गोव्यात सिगरेट व इतर तंबाखू उत्पादनांचा लोक किती प्रमाणात सेवन करतात व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरीय अंमलबजावणी गट काय करतात व त्यानी काय करावे यावर विचारविनिमय करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक (Surendra Naik) होते. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन, पंचायत, शिक्षण (Education) व पर्यटन (Tourism) संचालनालयांनी काय पावले उचलली आहेत याची माहिती जिल्हाधिकारी नाईक यानी दिली.

DLCC चे सदस्य सचिव डॉ. सारा जॉर्ज यानी सांगितले की तंबाखू निर्मुलन मोफत शैक्षणिक संस्थाना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. हे प्रशिक्षित लोक शाळांमध्ये जाऊन तंबाखू निर्मुलना संबंधी जागृती करणार आहेत. नगरपालिकांतील नव्याने निवडुन आलेल्या नगरसेवकांनाही या संदर्भात प्रशिक्षण दिले जाईल.

गोवकॅनचे संयोजक रोलांड मार्टिन्स यानी सांगितले की गुटखावर जाहीर बंदी असुनही गुटखा सर्वत्र उपलब्ध आहे. गुन्हा शाखा व कोकणी रेल्वे पोलिसांनी तंबाखू, गुटखा उत्पादने किती जप्त केली आहे व काय कारवाई केली आहे याची माहिती देण्याची मागणी केली.

दक्षिण गोव्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर कोतपा (COTPA) नियमन 4 खाली सर्व खबरदारी घेण्याचे आदेश दिले जातील असे मडगाव रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक प्रशांत गाड यानी सांगितले. स्वाती दळवी, पंचायत खात्याच्या उपसंचालिका हिने सांगितले की BDO द्वारे जिल्ह्यातील सर्व पंचायतीमध्ये ACT - 6 A खाली पुनरावलोकन केले जाईल असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT