Contractual Employees PF Benefits Dainik Gomantak
गोवा

Contractual Employees PF Benefits: कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पीएफचा लाभ; 3,800 जणांची नोंदणी, सरकारकडून अंमलबजावणी सुरू

Goa Contractual Employees PF Scheme: गोवा सरकारच्या विविध खात्यांमध्ये, महामंडळांमध्ये आणि स्वायत्त संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) लाभ देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा सरकारच्या विविध खात्यांमध्ये, महामंडळांमध्ये आणि स्वायत्त संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) लाभ देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ३,८०० कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली असून, नोंदणी करण्यासाठी शुक्रवार (ता.३०) हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुदतीत नोंदणी करणे आवश्यक आहे.

सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी झाली आहे, किती कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे आणि उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत, याचा आढावा आज सचिवालयात झालेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत घेण्यात आला. नोंदणीची अंतिम मुदत जवळ आल्याने या प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्य सरकारच्या कार्मिक विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) संरक्षण देण्याचे निर्देश जारी केले आहेत. १ जुलै २०१७ नंतर रुजू झालेले आणि १ नोव्हेंबर २०२५ रोजी सेवेत असलेले कर्मचारी यासाठी पात्र आहेत. सरकारी खाती, महामंडळे व स्वायत्त संस्थांतील कर्मचाऱ्यांची नोंदणी संबंधित प्रमुख करतील. कर्मचाऱ्यांना पूर्वीची थकीत कपात भरावी लागणार नाही. नियोक्त्याचा हिस्सा दरमहा १५ हजार रुपयांच्या वेतनमर्यादेनुसार निश्चित केला जाईल.

दरम्यान, जुलै २०१७ पूर्वी सेवेत दाखल झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही टप्प्याटप्प्याने ‘पीएफ’चा लाभ देण्याची प्रक्रिया कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या समन्वयाने सुरू असल्याचे कार्मिक विभागाच्या निर्देशांत नमूद आहे. या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निर्देश नंतर जारी केले जाणार आहेत.

इतर योजनांचाही मिळणार फायदा

कार्मिक विभागाच्या निर्देशांनुसार, वयाची ४० वर्षे पूर्ण न केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अटल पेन्शन योजनेत सहभागी होऊन योगदान देणे बंधनकारक आहे. तसेच पात्रतेनुसार सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत समाविष्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘पीएफ’बरोबरच पेन्शन आणि विमा संरक्षणाचा लाभ देण्यावर सरकारने भर दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Netanyahu Against Protest: निवडणूक निकालानंतर इस्रायली निदर्शकांचा रस्त्यांवर तांडव, नेतन्याहूंच्या घराला घेराव; 'अरब-यहूदी' सरकारची होतेय मागणी VIDEO

Kadamba Plateau Casting Yard Case: कदंब पठारावरील कास्टिंग यार्डचे भवितव्य न्यायालयाच्या हाती; निकाल राखीव

Goa Mining: सावर्डेत खनिज वाहतुकीला ब्रेक! 70 ट्रक स्थानिकांनी रोखले; बाहेरील ट्रकांना विरोध

Robin Uthappa Mumbai Indians Coach: आला रे आला! रॉबिन उथप्पाची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री; बनला संघाचा नवा बॅटिंग कोच

Vibrant Goa Summit: गोव्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक, 30 हजार नोकऱ्यांचे लक्ष्य; मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन

SCROLL FOR NEXT