Goa Mining: सावर्डेत खनिज वाहतुकीला ब्रेक! 70 ट्रक स्थानिकांनी रोखले; बाहेरील ट्रकांना विरोध

Savordem Truck Owners Protest: बाहेरील ट्रकांची वाहतूक बंद केल्याशिवाय खनिज वाहतूक सुरू करू देणार नसल्याचा इशारा ट्रकमालकांनी दिला आहे.
Savordem Truck Owners Protest
Goa MiningDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

केपे: कुड्डेगाळ-सावर्डे येथील फोमेंतो कंपनीने सावर्डे ट्रक संघटनेला विश्वासात न घेता सावर्डेबाहेरील ट्रकांना खनिज वाहतुकीत सामावून घेतल्याच्या निषेधार्थ सावर्डे पंचायत क्षेत्रातील ट्रकमालकांनी गुरुवारी (ता.२९) सकाळपासून खनिज वाहतूक रोखून धरली. या आंदोलनामुळे सावर्डे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, बाहेरील ट्रकांची वाहतूक बंद केल्याशिवाय खनिज वाहतूक सुरू करू देणार नसल्याचा इशारा ट्रकमालकांनी दिला आहे.

गुरुवारी सकाळी खनिजाने भरलेले सुमारे ७० ट्रक स्थानिक ट्रकमालकांनी अडवून धरले. या ट्रकांना खाली करण्यास परवानगी न दिल्याने गुड्डेमळ ते सावर्डे तिस्कपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी, परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केपेचे पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे आणि पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक हे पोलिस पथकासह सकाळपासून घटनास्थळी उपस्थित होते.

Savordem Truck Owners Protest
Vibrant Goa Summit: गोव्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक, 30 हजार नोकऱ्यांचे लक्ष्य; मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन

सकाळी सर्वप्रथम आलेले १५ ट्रक खाली करण्याची विनंती उपअधीक्षक राणे यांनी आंदोलकांना केली. मात्र, आंदोलकांनी ही विनंती फेटाळून लावत खनिजाने भरलेले सर्व ट्रक पुन्हा खाणीवर पाठविण्याची मागणी केली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत खनिजाने भरलेले ट्रक रस्त्यावरच उभे होते. बाहेरील ट्रकांच्या समावेशावरून निर्माण झालेला हा वाद कसा मिटणार आणि खनिज वाहतूक पुन्हा कधी सुरू होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्थानिकांत नाराजीचे वातावरण

फोमेंतो कंपनीने सावर्डे पंचायत क्षेत्राबाहेरील ट्रकांना खनिज वाहतुकीत सामावून घेतल्याने स्थानिक ट्रकमालकांत नाराजी पसरली आहे. पूर्वसूचना न देता निर्णय घेतल्याने फसवणूक झाल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष वल्लभ दळवी यांनी केला. कंपनीला यापूर्वी ६५० ट्रकांचे क्रमांक दिले होते. बाहेरील ट्रक वाढल्याने स्थानिकांना तीन दिवसांतून एकच खेप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होईल. बाहेरील ट्रक वगळल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

Savordem Truck Owners Protest
Goa ST Political Reservation: 'एसटी' आरक्षणाची ग्वाही; गोव्याच्या राजकारणात उलथापालथ? चार मतदारसंघांत नवी समीकरणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.