एम पी टीचे प्रभारी अध्यक्ष राजीव जलोटा यांना निवेदन देताना चंद्रकांत गवस बाजूस इतर Dainik Gomantak
गोवा

Goa: मुरगांव बंदरातील कंटेनर लाईन फिडर सेवा बंद करू नये

ही सेवा येत्या तीन ऑगस्टपासून खंडित करण्याचा निर्णय एमपीटीने (MPT) घेतला आहे. परंतु ही सेवा बंद करू नये यासाठी गोवा लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गवस यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देण्यात आले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: मुरगांव बंदरात 1992 सालापासून सुरू करण्यात आलेली " कंटेनर लाईन फिडर सेवा " (Container line feeder service) बंद करू नये अशी विनंती करणारे निवेदन गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज लॉजिस्टिक (Chamber of Commerce and Industries Logistics) समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गवस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एम पी टीचे प्रभारी अध्यक्ष राजीव जलोटा यांना दिले. ही सेवा (service) येत्या तीन ऑगस्टपासून खंडित करण्याचा निर्णय एमपीटीने (MPT) घेतला आहे. या निवेदनाची प्रत केंद्रीय बंदर मंत्री श्रीपाद नाईक यांना पाठवण्यात आली आहे.

लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष गवस यांच्यासह अध्यक्ष धीरेंद्र (मनुभाई) ठक्कर, सदस्य संतोष परब, सुधीर मणेरकर, मयूर नेगांधी यांच्या शिष्टमंडळामध्ये समावेश होता. याप्रसंगी एम पी टी चे वाहतूक व्यवस्थापकही उपस्थित होते. प्रभारी अध्यक्ष जलोटा यांच्या समवेत शिष्टमंडळाने कंटेनर सेवी संबंधी चर्चा केली. ही सेवा 1992 साली सुरू करण्यात आली होती. ही सेवा कस्टम ब्रोकर्स, वाहतूकदार, माल हाताळणी करणारे, गोदाम जहाजावरील मालाची चढउतार करणारे यांच्या व्यवसायांच्या निरंतरतेसाठी महत्त्वाची आहे. ही सेवा बंद केल्यास त्याचा थेट परिणाम 15 हजार कुटुंबावर होण्याची भीती आहे. या सेवेमुळे गोव्यातील सीमा शुल्क विभागाला माल आयातपायी मिळणारा उत्पन्नाखाली मोठा हिस्सा गमवावा लागेल. जो 1300 कोटीपेक्षा अधिक आहे असे स्पष्ट करण्यात आले.

चर्चेअंती जलोटा यांनी 1992 साली सुरू करण्यात आलेली सेवा एमपीटीकडून बंद करण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. या प्रकरणाचा योग्य तो अभ्यास करून कस्टम ब्रोकर, वाहतूकदार मालाची चढ-उतार करणारे व इतर संबंधित व अवलंबितांना योग्य न्याय देईल. एमपीटीचा महसुलावर परिणाम होणार नाही याकडेही लक्ष देण्यात येईल असे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT