Goa Container Blaze News Dainik Gomantak
गोवा

Goa Container Fire: दारूने भरलेल्या कंटेनरला भीषण आग, धारगळ महामार्गावर थरार; अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे 'अनर्थ टळला'

liquor Truck Fire Goa: महाखाजन, धारगळजवळ दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या एका कंटेनर ट्रकला अचानक भीषण आग लागली

Akshata Chhatre

Dargal Highway Accident: गोव्यातील कळंगुट-म्हापसा महामार्गावर मंगळवारी (१७ जून) सकाळी एक थरारक घटना घडली. महाखाजन, धारगळजवळ दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या एका कंटेनर ट्रकला अचानक भीषण आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की काही वेळातच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

अग्निशमन दलाची धावपळ आणि वेगवान कार्यवाही

म्हापसा अग्निशमन दलाचे उपाधिकारी प्रशांत धारगळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७:४५ च्या सुमारास महाखाजन, धारगळ येथे कंटेनरला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली.

विशेष म्हणजे, माहिती मिळताच अवघ्या आठ मिनिटांच्या आत अग्निशमन दलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

आगीची तीव्रता आणि कंटेनर दारूने भरलेला असल्याने परिस्थिती गंभीर होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत वेगाने आणि कौशल्याने कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि काही वेळातच आगीच्या मोठ्या ज्वाळा विझवण्यात यश मिळवले.

आगीचे कारण आणि पुढील तपास

या घटनेत कंटेनर ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर ताबा मिळवल्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. सध्या पोलीस या आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.

कंटेनरमध्ये दारू असल्यामुळे आगीने त्वरित पेट घेतला असावा, मात्र यामागे काही तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. आणखी तपशील हाती येणं बाकी असून, लवकरच या घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असं म्हणावं लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT