Goa Constable Salary Dainik Gomantak
गोवा

Goa Constable Salary: सांगा कसं जगायचं? गोव्यातील 800 कॉन्स्टेबल 5 महिने पगाराविना...

गणेश चतुर्थी जवळ आल्याने, हे पगार त्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत काहींनी व्यक्त केले

Kavya Powar

Goa Constable Salary: सध्या गोव्यातील कॉन्स्टेबल आर्थिकदृष्ट्या पिचून गेल्याचे समोर आले आहे. होमगार्डमधून कॉन्स्टेबल बनलेलेच नव्हे तर सध्या दिल्ली पोलिस ट्रेनिंग अकादमी तसेच वाळपई येथील पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये (PTS) प्रशिक्षण घेत असलेले नवीन भरती झालेले देखील आर्थिकदृष्ट्या त्रस्त आहेत. कारण या सर्वाना तब्बल पाच महिन्याचा पगार मिळालेला नाही.

याबाबत काही पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून दररोज 160 रुपये दिल्लीतील पोलीस अकादमीमधील कॅन्टीन मॅनेजमेंट करणाऱ्या एनजीओकडे दिले जातात.

ही रक्कम दिवसभराचा नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि रात्रीच्या जेवणासाठी असते. परंतु कॉन्स्टेबल भरती झालेल्यांना त्यांचे पगार मिळालेले नसल्यामुळे ते यासाठी फी भरण्यास असमर्थ आहेत.

त्यामुळे पगारासोबतच दैनंदिन मेस चार्जेसची आणखी एक चिंता त्यांच्यासमोर आता निर्माण झाली आहे. परिणामी, मेसमध्ये जेवणासाठी विविध उत्पादनांचा पुरवठा करणारे काही उत्पादक आता मालाचा पुरवठा करण्यास कचरत आहेत.

गणेश चतुर्थी जवळ आल्याने, हे पगार त्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. माहितीनुसार सुमारे 500 नव्याने भरती झालेले दिल्ली पोलिस ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत तर 300 वाळपईतील पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्येजण मध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

या भरती करणार्‍यांना सुमारे 23,000 ते 25,000 रुपये मासिक उत्पन्न मिळते. यापैकी, त्यांना त्यांच्या मेसच्या खर्चासाठी दररोज 160 रुपये देणे अपेक्षित आहे, परंतु त्यांना पगारच मिळाला नसल्याने जेवणाचे पैसे देता येत नाही अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT