Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar : संविधानामुळे भाजप आवाज दाबू शकणार नाही! अमित पाटकर यांचे टीकास्त्र; 'रक्षक अभियानाला' सुरुवात

Amit Patkar criticizes BJP, says Constitution will prevent silencing opposition: राज्यभर ‘संंविधान रक्षक अभियान' राबविले जाणार असून, ते ६० दिवस चालेल,अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Samvidhan Rakhsak Abhiyan Congress Campaign Goa

पणजी: राज्यात अनेक समस्या आहेत, त्या समस्यांकडे भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. या बेरोजगारी, भ्रष्टाचार, सुरक्षितता, अशा विविध प्रश्नांबाबत राज्यभर काँग्रेस जनजागृती करणार आहे. राज्यभर ‘संंविधान रक्षक अभियान' उद्या, बुधवापासून राबविले जाणार असून, ते ६० दिवस चालेल,अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

काँग्रेस भवनात मंगळवारी सांयकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा आणि ॲड. श्रीनिवास खलप यांची उपस्थिती होती.

पाटकर म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढल्यानंतर सर्वांना संघटित करण्याचे प्रयत्न केले. संविधान बदलण्याचा प्रयत्न देशात होत असल्याने त्यांनी त्याविरोधात देशभर आवाज उठविला. देशासमोर विविध प्रश्न आहेत, त्यावर केंद्र सरकार काहीही बोलत नाही.

भाजप सरकार ज्यांची खुशामत करीत आहे, त्यांच्यामुळे समाजात श्रीमंत-गरीब अशी दरी तयार होतेय. राज्यातीलही समस्यांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष होत आहे. नोकरी घोटाळा घडलेला असताना त्याचा नीट तपास होत नाही. घोटाळ्यांचे प्रकरण गाजत असताना सरकारने त्यावरून लक्ष हटावे म्हणून जुने गोवेतील एक्स्पोजीशनकडे वळविले.

पणजीत बंदी; राज्यभर आंदोलन सुरूच!

आम्ही ‘कॅश फॉर जॉब` प्रकरणाची न्यायालयीन चौकशीच्या मागणीसाठी पणजीत आंदोलन केले, परंतु आमचा आवाज दाबण्यासाठी आम्हाला अटक करून आंदोलन करण्यास बंदी घातली. पणजीत बंदी घातली असली तरी राज्यभर आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. सरकारने कितीही आवाज दाबला तरी आम्ही गप्प बसणार नाही. सामान्यांच्या विषयावर आम्ही बोलत राहणार आहोत, असे पाटकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT