Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: ‘दक्षिण गोव्यावर काँग्रेसचा झेंडा'; कुठलेही पक्ष रिंगणात उतरले तरी विजय काँग्रेसचाच

Goa Congress: 'विजय अटळ', सार्दिन यांना विश्‍वास : लोक कामांची पावती देणार

Ganeshprasad Gogate

Goa Congress: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कुठलेही पक्ष रिंगणात उतरले तरी काँग्रेस पक्षाचा विजय ते रोखून ठेवू शकणार नाहीत.

मागच्‍यावेळीही हे सर्व पक्ष रिंगणात होते तरी दक्षिण गोव्‍यातून काँग्रेसच विजयी झाला होता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया दक्षिण गोव्‍याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी दिली आहे.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना सार्दिन यांनी काँग्रेस पक्षाने पुन्‍हा एकदा आपल्‍याला उमेदवारी दिल्‍यास दक्षिण गोव्‍यातून निवडून येण्‍यास आपण सक्षम आहे, असे मत व्‍यक्‍त केले.

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करून इंडिया आघाडी स्‍थापन केलेल्‍या आघाडीत सामील असलेल्‍या आम आदमी पार्टीकडून दक्षिण गोव्‍यासाठी बाणावलीचे आमदार व्हेन्‍झी व्‍हिएगस यांचे नाव उमेदवार म्‍हणून जाहीर केले आहे.

यासंदर्भात सार्दिन यांना विचारले असता ते म्हणाले, 'या देशातून भ्रष्‍टाचारी आणि धार्मिक विद्वेश पसरविणारे भाजप सरकार हद्दपार व्‍हावे ही काँग्रेसबरोबरच ‘आप’चीही इच्‍छा आहे. त्‍यामुळे दोन्‍ही पक्ष गंभीरपणे या युतीकडे पाहात आहेत.

खासदार निधीतून मी दक्षिण गोव्‍यात 20 काेटींची कामे मार्गी लावली आहेत. मी माझा सर्व निधी खर्च केला आहे. त्‍याशिवाय पूर्वीचे भाजप खासदार नरेंद्र सावईकर यांनी खर्च न करता शिल्‍लक ठेवलेले 2.60 कोटी रुपयेही खर्च केले.

त्‍यात दक्षिण गोव्‍यातील कित्‍येक शाळांना संगणक आणि लॅपटॉप, पाच ठिकाणी खेळण्‍यासाठी मैदाने, पाच ठिकाणी दफनभूमी याशिवाय आणखी कित्‍येक कामे मी केली आहेत.

या कामांमुळेच मला लोक पुन्‍हा निवडून देतील याची मला खात्री आहे, असे मत दक्षिण गोव्‍याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Francisco Colaco: अभिमान! डॉ. फ्रान्‍सिस कुलासाे ‘अमेरिकन कार्डिओग्राफी’ची फेलोशिप; सोसायटीचे 31वे फेलो

Ahmedabad Plane Crash: 'जळालेली झाडे अन् काळवंडलेल्या भिंती'! अहमदाबाद विमान अपघातानंतर वैद्यकीय वसतिगृहाची भीषण अवस्था

Goa Fishing: '..भविष्यात मासेच संपतील'!पारंपरिक मच्छिमारांकडून मासेमारी बंदीचे उल्लंघन; ट्रॉलरमालकांची कारवाईची मागणी

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात 6 महिन्‍यांत 11 खून प्रकरणे, फोंडा आघाडीवर; परप्रांतीय कामगारांचा वाढता सहभाग चिंताजनक

Goa Live News: थातोड- धारबांदोडा येथे अज्ञात वाहच्या धडकेत दोन म्हशी दगावल्या

SCROLL FOR NEXT