Manohar International Airport, Goa  Dainik Gomantak
गोवा

Manohar Parrikar: ‘मनोहर’ नावाचे आमच्याकडे मासेविक्रेते आणि पोदेर, मोपाच्या नावावरून काँग्रेसची बोचरी टीका

‘मनोहर’ असे अपूर्ण नाव देऊन भाजपने काय साध्‍य केले?

Pramod Yadav

Manohar International Airport: गेल्‍या अनेक वर्षांपासून सतत या ना त्‍या कारणाने चर्चेत राहिलेल्‍या मोपा (Mopa) आंतरराष्‍ट्रीय विमानतळाचे लोकार्पण झाल्‍यानंतरही त्‍यामागचे शुक्लकाष्ठ काही संपत नाहीय. आता या विमानतळाच्‍या नामकरणावरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव या विमानतळाला द्यायचेच होते तर निदान ते पूर्ण तरी दिले पाहिजे होते. ‘मनोहर’ असे अपूर्ण नाव देऊन भाजपने काय साध्‍य केले? असा सवाल काँग्रेसचे हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी उपस्‍थित केला. तसेच आमच्याकडे ‘मनोहर’ नावाचे मासेविक्रेते आणि पोदेर आहेत, अशी बोचरी टीका फेरेरा यांनी केली.

मोपा विमानतळाला ‘मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे नाव देण्‍यामागे भाजपचा काही वेगळाच डाव असला पाहिजे. अपूर्ण नाव देऊन सरकारने पर्रीकरांबरोबरच राष्‍ट्रीय नेत्‍यांचाही अपमान केला आहे, असा आरोप फेरेरा यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर, सरचिटणीस ॲड. श्रीनिवास खलप, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर यांचीही उपस्थिती होती.

पाटकर म्‍हणाले की, देश उभारणीमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांचे मोठे योगदान आहे. भाजपला त्‍याचा विसर पडला आहे. सरकार विकासाचा दावा करत असले तरी त्यांच्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मृतिस्थळ अनेक वर्षे रखडले आहे. यावरून भाजपच्या ‘विकासाची गती’ लक्षात येते. ‘मोपा’वर काल जो गोंधळ उडाला, त्‍यास सरकारच जबाबदार आहे. गर्दी जमवून लोकांना प्रवेश नाकारणे, हा त्‍यांचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही पाटकर यांनी केली.

कार्यक्रम म्हणजे ‘तमाशा’च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी गोव्यात जे कार्यक्रम झाले, ते म्हणजे तमाशा किंवा यात्रेचाच प्रकार असल्याची टीका काँग्रेसने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सरकार चालवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी ब्रिटिशांनी देशाची तिजोरी रिकामी केली होती. त्या स्थितीतही त्यांच्या दूरदृष्टीने देशात विविध संस्था आणि प्रकल्पांच्या रूपात भक्कम साधनसुविधा त्यांनी निर्माण केल्या. त्या सुविधांचा उपयोग देशाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला, परंतु दुर्दैवाने मोदी सरकार देशाच्या संपत्तीची एकामागून एक विक्री करीत आहे.

आयुर्वेद काँग्रेसमध्ये गांजाचा स्टॉल!

पणजीत पार पडलेल्‍या नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये चक्क गांजाचा स्टॉल लावण्‍यात आला होता, असा आरोप अमित पाटकर यांनी केला. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करणे आवश्यक आहे. सरकारमान्य कार्यक्रमांमध्ये बंदी असलेल्या अमलीपदार्थाचा स्टॉल असणे बेकायदा आहे, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT