मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "बेजबाबदार व अकार्यक्षम मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा"

काँग्रेसचे (Goa Congress) प्रवक्ते ॲड. श्रीनिवास खलप (Srinivas Khalap) यांची भाजपवर (Goa BJP) टिका

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील (Goa) भाजप (BJP) सरकार म्हणजे दुर्गंधीयुक्त कचरा यार्ड बनले आहे. उच्च न्यायालयाकडून (High court) या सरकारला वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने चपराक बसत असून, बेजबाबदार व अकार्यक्षम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते ॲड. श्रीनिवास खलप (Srinivas Khalap) यांनी केली. (Goa Congress spokesperson Adv. Srinivas Khalap criticized Chief Minister Pramod Sawant)

काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सांडपाणी निचरा महामंडळाकडून पणजीत उघड्यावर सोडण्यात आलेल्या घाणी बद्दल सरकारची चांगलीच कानउघाडणी केली होती, त्यावर ॲड. खलप यांनी ही मागणी केली. भाजप सरकारने 2012 ते 2021 पर्यंत हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या तक्रारदाराविरूद्ध कारवाईचा ससेमिरा लावला त्यावर भाजप सरकारला ‘तुमच्याकडे आणखी काम नाही का?’ असा प्रश्न विचारून उच्च न्यायालयाने भ्रष्ट भाजपची कानउघाडणी केली असा त्यांनी टोला हाणला.

सुडाचे राजकारण

उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणातून भाजप सरकारचे सूडाचे राजकारण परत एकदा समोर आले असून, सरकारच्या नाकर्तेपणाविरूद्ध बोलणाऱ्यांची बोलती बंद करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग भाजप सरकार करीत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाल्याचा त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

India T20 World Cup Squad: सूर्यकुमारसाठी हा 'वर्ल्डकप' शेवटचा? हरपलेल्या फॉर्ममुळे वाढले टेन्शन; गिलबाबतही प्रश्नचिन्ह

स्वातंत्र्यसैनिकांनी जो गोवा दिला, तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी! CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

SCROLL FOR NEXT