Goa Congress Rebel MLA Meets Amit Shah Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Rebel : दीर्घ प्रतिक्षेनंतर काँग्रेसमधील बंडखोरांची अमित शहा, नड्डांसोबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मात्र भेट नाहीच; व्यस्त असल्याचं कारण देत भेट नाकारली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Rebel : आठपैकी सात बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत काल सोमवारी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र, बहुप्रतिक्षित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ते व्यस्त असल्याने झालीच नाही. पुढील वेळी त्यांना भेटू, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले.

सोमवारी सायंकाळी सहा वाजता पक्षांतर केलेल्या माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा यांच्यासह केदार नाईक, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, रुडाल्फ फर्नांडिस, दिलायला लोबो या सात आमदारांसह मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दिल्ली दौरा आखत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते. यावेळी दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी गोव्यातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. तसेच पक्षात आलेल्या आमदारांना पक्ष वाढविण्याच्या सुचनाही केल्या. दरम्यान, बंडखोरांची पंतप्रधान मोदींसोबत भेट होऊ शकली नाही. ते पूर्वनियोजित कामात व्यस्त होते.

मंत्रिपदांबाबत चर्चा नाही

अमित शहा आणि नड्डा यांच्या बैठकीमध्ये कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे व अन्य कोणती लाभाची पदे द्यायची याबाबत कसली चर्चा झाली नाही. त्यामुळे सध्यातरी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार नाहीत. पण बंडखोरांपैकी काहींना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.

मायकल लोबोंची भेट चुकलीच

मायकल लोबो या सात आमदारांसोबत राष्ट्रीय नेत्यांना आज भेटणार होते. मात्र, ते मित्राच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. ते परस्पर दिल्लीला येणार होते. ते आज पोहोचू शकले नाहीत. मात्र, त्यांच्या पत्नी दिलायला या उपस्थित होत्या.

लोकसभेच्या दोन्ही जागा जिंका

नव्याने दाखल झालेल्या या आमदारांना राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी गोव्यातल्या लोकसभेच्या दोन्ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकाच, असे सांगितले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व नियोजन करावे, अशीही सूचना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

SCROLL FOR NEXT