Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Rebel : दिगंबर यांची अमित शहांशी भेट; सरकारच्या रचनेसंदर्भात चर्चा

काँग्रेस फुटीर गटाचे नेते दिगंबर कामत यांनी आज गुरुवारी दिल्लीला भेट देऊन भाजपश्रेष्ठींशी चर्चा केली.

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेस पक्षात फूट घालून अकरापैकी आठजणांना भाजपात सामील करून घेतल्यानंतरच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत गोवा सरकारमध्ये बदल केले जातील, हे आता निश्‍चित आहे. त्यावर प्राथमिक चर्चेसाठी काँग्रेस फुटीर गटाचे नेते दिगंबर कामत यांनी आज गुरुवारी दिल्लीला भेट देऊन भाजपश्रेष्ठींशी चर्चा केली. कामत यांना गृहमंत्री अमित शहा यांनी खास दिल्लीला बोलावून घेतले होते. तत्पूर्वी कामत यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पणजीत भेट घेतली. गोवा मंत्रिमंडळात तत्काळ बदल करण्याऐवजी दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने त्यात बदल होतील, अशी माहिती दिल्लीहून प्राप्त झाली.

दिल्लीबाहेर दौऱ्यावर असलेले अमित शहा संध्याकाळी उशिरा राजधानीत परतल्यानंतर त्यांची दिगंबर कामत यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. काँग्रेस गट पक्षात सामील करून घेण्याची चर्चा कामत यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली होती. त्यांच्या सूचनेवरूनच गृहमंत्र्यांनी पुढील व्यूहरचना तयार केली व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गोव्याची आघाडी सांभाळण्यास सांगितले होते. कामत यांच्या नेतृत्वाखाली सहाजणांचा गट पक्षांतरासाठी तयार होताच. परंतु उर्वरित दोघा सदस्यांना ‘राजी‘ करून घेण्यात मुख्यमंत्री सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसमधील फुटीरांना भाजप नेतृत्वाने प्रत्येकी 30 ते 40 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी गुरुवारी पणजीत पत्रकार परिषदेत केला. आठजणांच्या गटाला पक्षात प्रवेश देण्यासाठी सारी व्यूहरचना दिल्लीत तयार करण्यात आली. सुरवातीला स्थानिक पक्षनेतृत्वालाही केंद्राने विश्‍वासात घेतले नव्हते. अजूनही या गटातील सदस्याला सरकारात सामील करून घेतल्यानंतर काय ‘परतावा‘ मिळेल याचा कोणताही स्थानिक नेतृत्वाला नाही.

मंत्रिपदांबाबत अनिश्‍चितता

1. भाजपात सामील झालेल्या आठपैकी किमान दोघांना मंत्रिपद मिळेल, हे निश्‍चित आहे. परंतु काही आमदार ‘दिल्ली’ने तिघांना मंत्रिपदाचा वायदा केल्याची माहिती देतात. सुरवातीला दोन मंत्रिपदे निश्‍चित झाली होती, पण दोन आमदार गळाला लागणे कठीण आहे, हे समजल्यावर तिसऱ्या मंत्रिपदाचे आमिष त्यांना दाखविण्यात आले, अशी माहिती मिळते.

2. आज भाजपच्या सुकाणू समितीची बैठक पणजीत झाली असता त्यात बुधवारच्या घडामोडींविषयी माहिती देण्यात आली. परंतु किती मंत्रिपदे त्यांना निश्‍चित झाली आहेत किंवा आणखी काही आश्‍वासने देण्यात आली आहेत काय, यासंदर्भात कोणाला काही माहिती नव्हती.

3. ‘शहा यांनी कामत यांना एकटेच दिल्लीला बोलावून घेतले. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे यावर या बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता आहे’, अशी माहिती एका ज्येष्ठ सदस्याने दै. ‘गोमन्तक’ला दिली. तसेच कामत यांची गोवा सरकारमध्ये काय ‘भूमिका’ असेल यावरही दिल्लीत शिक्कामोर्तब होईल.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दिल्लीत वाढले वजन

सावंत यांचे सरकारमधील स्थान फुटीर गटामुळे आणखी भक्कम बनले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सांयकाळी 5.30 वाजता गोव्यातील घडामोडींसदर्भात त्यांना व्यक्तीशः फोन करून माहिती घेतली. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला केरळमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याच्या दिवशीच गोव्यात ‘काँग्रेस छोडो‘चा स्फोट घडवत मोठा अपशकून करण्याची ही योजना यशस्वी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचेही वजन दिल्लीत वाढले आहे. या घडामोडींमुळे देशभर काँग्रेसचे नीतीधैर्य खचले.

भाजपमध्येही असंतोष

‘आठजणांच्या नेत्यांबरोबर दिल्लीतच पक्षश्रेष्ठींनी चर्चा केली आहे. स्थानिक नेत्यांना याबाबत अजूनतरी काहीच अंदाज नाही,’ अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली. या प्रवेशासंदर्भात काँग्रेसमध्ये जशी अस्वस्थता आहे, तसाच भाजपमध्येही असंतोष आहे. पक्षश्रेष्ठींनी परस्पर दिल्लीत यासंदर्भात निर्णय घेतल्याचीही खंत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली.

तरीही सावंत निर्धास्त

नव्या सदस्यांना मंत्रिमंडळात सामील करून घ्यायचे असल्यास तेवढ्या मंत्र्यांना घरी पाठवावे लागणार आहेत, ही एक नवी डोकेदुखी मुख्यमंत्र्यांना सतावू लागली आहे. मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत निर्धास्त आहेत. सध्या त्यांची देहबोली ‘विलक्षण आक्रमक’ आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने या प्रतिनिधीला दिली.

कामत यांना मडगावात पाठिंबा

मडगावात नगराध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होत असून काँग्रेस फुटीर गटाचे नेते दिगंबर कामत यांनी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पालिकेतील भाजप नगरसेवक आपल्याला जुमानत नसल्याची खंत कामत यांना आहे. त्याचसंदर्भात पक्षसंघटनेने निवडणुकीत हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तद्‍नंतर संध्याकाळी उशिरा मडगावच्या रवींद्र भवनात मुख्यमंत्र्यांनी भाजपपुरस्कृत नगरसेवकांची बैठक घेऊन दिगंबर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पालिका निवडणुकीची व्यूहरचना निश्‍चित झाली.

पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरूनच आठजणांना भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. पक्षश्रेष्ठींनी नव्या सदस्यांना काय शब्द दिला आहे, हे आम्हाला अद्याप पुरते ठाऊक नाही. त्यासंदर्भात दिल्लीला गेल्यावरच पक्षश्रेष्ठींची सल्लामसलत करून ठरेल. येत्या सोमवारी माझीही दिल्लीत भेट ठरली आहे. - सदानंद तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईचा धमाका; सर्वात जलद 'अर्धशतक' ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड! VIDEO

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

SCROLL FOR NEXT