Goa Congress Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांविरोधात काँग्रेस आक्रमक, पोलिस मुख्यालयावर काढला मोर्चा; सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी

Goa Congress Police Headquarters Protest: राज्यातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांतील पीडितांना न्याय मिळवून देण्याबरोबरच भविष्यात अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी गोवा प्रदेश युवक काँग्रेसने गुरुवारी गोवा पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढला.

महिला आणि बालकांचे संरक्षण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेसने गृह खाते आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिला आणि बालकांविरोधातील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांत गेल्या पाच वर्षांत ६३ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावाही काँग्रेसने केला.

गोवा प्रदेश काँग्रेस समिती, गोवा प्रदेश महिला काँग्रेस आणि इतर आघाडी संघटनांच्या सहकार्याने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ‘सुरक्षा वाढवा, बेटी वाचवा’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. म्हापसा, काणकोण आणि कुडचडे येथे अलीकडे घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांबद्दल आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अशा घटना वारंवार घडत असताना सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या बाबतीत अपेक्षित गांभीर्य दाखविले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. आर्चित नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी प्रवक्त्या अ‍ॅड. शबनम खान, माजी महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महिला व बालकांविरोधातील गुन्ह्यांचा कालमर्यादेत तपास, प्रतिबंधात्मक पोलिस यंत्रणेचे बळकटीकरण, निष्काळजी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि पीडितांना संरक्षण देणे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

यंत्रणा अपयशी

प्रसारमाध्यमांशी बोलताना अमरनाथ पणजीकर यांनी गेल्या पाच वर्षांत महिला आणि बालकांविरोधातील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांत ६३ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा केला. देशातील महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण ४.३ टक्के असताना गोव्यात हे प्रमाण १३.३ टक्के असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रतिमेला धोका

युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. आर्चित नाईक यांनी वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे गोव्याच्या सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून असलेल्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली. गुन्हेगारी वाढत असताना गोमंतकीय नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

कार्यवाहीचा मागितला अहवाल

पोलिस महासंचालकांना सादर केलेल्या निवेदनातून काँग्रेसने सात दिवसांच्या आत कार्यवाहीचा सविस्तर लेखी अहवाल देण्याची मागणी केली आहे. अलीकडील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांचा निष्पक्ष आणि कालमर्यादेत तपास करणे, तपासात किंवा गुन्हे रोखण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, संवेदनशील भागांत रात्रीची गस्त वाढविणे आणि देखरेख व्यवस्था सक्षम करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.v

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगात पगारवाढीचा मोठा प्रस्ताव! बेसिक सॅलरी 69 हजार, पेन्शन 67 टक्के अन् HRA 40 टक्के करण्याची मागणी

खरी कुजबुज: विरोधकांना जाग आली!

भविष्यातील युद्धे आधुनिक तंत्रज्ञानावर लढणार-संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

IND vs NZ 4th ODI: न्यूझीलंडच्या फलंदाजासोबत गुरनूर ब्रार भिडला! विकेटनंतर मैदानावर हायव्होल्टेज ड्रामा, विराट कोहली धावत आला अन्... Watch Video

Woman Death Case: सत्तरीतील दाबे येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; विषारी फळे खाल्ल्याचा प्राथमिक अंदाज, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT