Woman shaves her head Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : काँग्रेस कार्यकर्तीने केले मुंडण; मणिपूरमधील घटनेचा नोंदवला निषेध

गोवा युवक काँग्रेसच्या सदस्यांनी मणिपूरमधील घटनेचा निषेध नोंदवला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress On manipur violence : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा घटनेचा आज गोवा युवक काँग्रेसच्या सदस्यांनी निषेध केला. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत घोषणा दिल्या.

पणजीतील आझाद मैदानावर एकत्र येवून युवक काँग्रेस आणि इतरांनी आज निषेध व्यक्त केला. यावेळी मणिपूरमधील घटनेच्या निषेधार्थ दक्षिण गोव्यातील एका महिलेने तिच्या डोक्याचे मुंडण केले.

"मी हे माझ्या इच्छेने करत आहे, आणि कोणीही माझ्यावर हे करण्यास भाग पाडले नाही. मणिपूरमधील परिस्थिती भयानक आहे. मी प्रार्थना करते की ती लवकर सुधारेल." असे मुंडण केलेली युवती म्हणाली. यावेळी शेफान शेख, अरविंद नंदा, रीना लोपेझ आणि ताहिया पिंटो उपस्थित होते.

गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद्र म्हणाले, "मणिपूरचे लोक 70 दिवसांपासून त्रस्त आहेत. भाजप सरकारच्या पाठिंब्याने गुन्हेगारांनी चर्च जाळले, जमावाने महिलांवर अत्याचार केले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडून आम्हाला केवळ एका घटनेवर नाही तर मागील 80 दिवसांत मणिपूर मध्ये जे घडले आहे त्यावर विस्तृत विधानाची अपेक्षा आहे. आम्ही मणिपूरच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत. शांतता हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे."

अहराज मुल्ला म्हणाले की, "गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मणिपूर प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करावी. मणिपूर प्रकरणाला भाजप सरकार जबाबदार आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,” असे ते म्हणाले.

विजय भिके म्हणाले की, "मणिपूरची परिस्थिती पूर्णपणे कोलमडली आहे आणि याला भाजप सरकार जबाबदार आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मणिपूरमध्ये आमच्या बहिणींना अशी वागणूक दिली जाते हे लज्जास्पद आहे” असे ते म्हणाले.

सिसिल रॉड्रिग्स म्हणाल्या, "दोन दिवसांपूर्वी प्रसारित झालेला व्हिडिओ चिंताजनक आहे. आपल्या देशात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सर्व महिलांसाठी ही निराशाजनक बाब आहे. आज हे मणिपूरमध्ये घडले, उद्या गोव्यातही घडू शकते. अशावेळी लोक मौन राखून बघत राहणार का? असा सवाल त्यांनी यावेळी केला"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT