Mapusa Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Stand: 'हेच का ते खड्डेमय झालेले पंचतारांकित बसस्थानक'? गोवा काँग्रेसचा सवाल; रस्त्यावर ठिय्या मारून नोंदवला निषेध

Goa Congress Protest: भिके यांनी म्हापसा बसस्थानकाच्या आवारातील रस्त्यावर ठिय्या मारून येथील खड्ड्यांसह दर्जाहीन बसस्थानकाच्या एकंदर परिस्थितीवरून सरकार तसेच आमदारांचा निषेध नोंदविला.

Sameer Panditrao

म्हापसा: शहरात दोन कदंब बसस्थानके आहेत. मात्र, त्यांची दुरुस्ती आणि दर्जा राखण्यात विद्यमान आमदार कमी पडले आहेत. याची कबुली त्यांनी स्वतः पावसाळी विधानसभा अधिवेशनात दिली, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी केली.

भिके यांनी म्हापसा बसस्थानकाच्या आवारातील रस्त्यावर ठिय्या मारून येथील खड्ड्यांसह दर्जाहीन बसस्थानकाच्या एकंदर परिस्थितीवरून सरकार तसेच आमदारांचा निषेध नोंदविला.

शनिवार, २ ऑगस्ट रोजी, दुपारी म्हापसा कदंब बसस्थानकाच्या आवरात आयोजित पत्रकार परिषदेत भिके बोलत होते. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, गटाध्यक्ष मीताली गडेकर व परेश पानकर हे उपस्थित होते.

म्हापशाचे आमदारच विधानसभेत सुसज्ज म्हापसा बसस्थानकाची मागणी प्रलंबित असल्याचे बोलत आहेत. यापूर्वी त्यांनी म्हापशात पंचतारांकित बसस्थानक उभारणार असल्याचे सांगितले होते आता हेच का ते खड्डेमय झालेले ते पंचतारांकित बसस्थानक? असा सवाल विजय भिके यांनी उपस्थित केला.

ST Reservation Bill Passed: गोव्यातील एसटी समाजासाठी आनंदाची बातमी; राजकीय आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

Raksha Bandhan 2025: लहान भावाला द्या अशा भेटवस्तू, जे पाहून त्याच्या चेहऱ्यावर येईल हसू; पाहा Gift Ideas

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT