Goa Congress President and mla Meet Himachal Pradesh CM Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी गोवा काँग्रेसच्या आमदारांना दिला 'कानमंत्र'

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भेटले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांचा विश्वास पुन्हा जिंका असा सल्ला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिला. मुख्यमंत्री सुखू हे गोव्याच्या खाजगी दौऱ्यावर आले आहेत.

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, ॲड. कार्लुस फरेरा आणि अल्टोन डिकोस्टा या तीन आमदारांसह दक्षिण गोव्यातील एका हॉटेलमध्ये हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी गोव्यात काँग्रेस मजबूत करण्यावर चर्चा झाली.

काही महिन्यांपूर्वी, हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत सुखूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी याआधी काँग्रेस पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पक्ष बांधणीचा त्यांना मोठा अनुभव आहे आणि एक उत्तम प्रशासक म्हणून पक्षात त्यांची ओळख आहे.

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, “आम्ही त्यांच्याशी प्रदेश काँग्रेसला तळागाळापर्यंत कसे नेले पाहिजे आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षाला पुन्हा मजबूत कसे करता येईल यावर चर्चा केली."

पाटकर म्हणाले की, सुखू यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वारंवार बैठका घेऊन राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवण्याचा सल्ला दिला. गरज पडेल तेव्हा प्रदेश काँग्रेसला पूर्ण मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा लोकांकडे जाण्याचा आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा सल्ला दिला आहे. महागाई आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी आम्हाला लोकांसाठी लढण्याचा सल्ला दिला,” असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokotsav 2026: हडफडे आग दुर्घटनेचा लोकोत्सवावर परिणाम! स्टॉल्सच्या संख्येवर मर्यादा लागू; विक्रेत्‍यांना लाखोंचे नुकसान

Ro Ro Ferry Sapendra Divar: सापेंद्र-दिवाडी जलमार्गावर होणार 2 रो-रो फेरीबोटी! बेती-पणजी मार्गावरही मोठ्या आकाराची फेरीबोट

Goa Land Misuse: जमीन दिली शेतीसाठी, प्रत्‍यक्षात उभारली व्‍यावसायिक आस्‍थापने! ‘जमीन महसूल’च्‍या कलम 18 ‘क’चा 8 जणांकडून गैरवापर

Goa Politics: खरी कुजबुज; काणकोणात रेव्‍ह पार्ट्या सुरू?

Colvale Jail: धक्कादायक! कारागृहात कैद्यांना पुरवले मोबाईल ‘चार्जिंग प्लग', कोलवाळ तुरूंगात होणार ‘विद्युत ऑडिट’

SCROLL FOR NEXT