Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गिरीश चोडणकर पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खजिनदारपदी दत्ता दामोदर नायक यांची निवड

girish chodankar appointed goa congress president: गोव्‍यात विधानसभा निवडणूक मुदतपूर्व होण्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने प्रदेश नेतृत्वात बदल करत गिरीश चोडणकर यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्‍यात विधानसभा निवडणूक मुदतपूर्व होण्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने प्रदेश नेतृत्वात बदल करत गिरीश चोडणकर यांची पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर गिरीश यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात येणार, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात होती, ती खरी ठरली.

चोडणकर यांच्यासोबत तीन कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि आमदार कार्लुस फेरेरा यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दत्ता नायक यांची प्रदेश खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याकडे प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार विरियातो फर्नांडिस यांची जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहअध्यक्षपदी सुनील कवठणकर यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, मावळते प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्यात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेतली. काँग्रेसमध्ये नव्या नेत्यांची फळी तयार करत त्यांनी पक्षाचे काम पुढे नेले. महिला आणि युवक विभागांच्या नव्या समित्या कार्यरत करून सरकारविरोधी आवाज राज्यात बुलंद राहील, याचीही त्यांनी दक्षता घेतली.

केंद्रीय समितीकडून पाटकरांचे कौतुक

गिरीश चोडणकर यांची निवड करतानाच केंद्रीय समितीने मावळते प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी मागील चार वर्षांत केलेल्‍या पक्षीय कार्याचे कौतुक केले आहे. दरम्‍यान, पाटकर यांना विचारले असता ते म्‍हणाले, ‘माझे काँग्रेस नेतृत्‍वाला पूर्ण सहकार्य राहील. आम्‍हाला गोव्‍यात काँग्रेस पुन्‍हा सत्तेवर आणायची आहे’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pradhan Mantri Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

SCROLL FOR NEXT