Atishi Sing AAP Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa India Alliance: आतिषी यांनी यापूर्वीही गोव्यात आप काँग्रेसबरोबर आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले होते. आताही पुनरुच्चार केल्याने स्थानिक नेत्यांची काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या मनीषाला तडा गेला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावलेला आहे. इतर राज्यांच्या व लोकसभा निवडणुकांबाबत काँग्रेसने घेतलेली भूमिका पाहता केंद्रीय स्तरावर आम आदमी पक्ष (आप) इंडिया आघाडीचा घटक राहिलेला नाही. गोव्यात काँग्रेसबरोबर आघाडीची शक्यता नाही, असे आपच्या गोवा प्रभारी तथा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांनी शनिवारी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

आतिषी यांनी यापूर्वीही गोव्यात आप काँग्रेसबरोबर आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचाच त्यांनी आताही पुनरुच्चार केल्याने स्थानिक नेत्यांची काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या मनीषाला तडा गेला आहे. कारण मागील वक्तव्यानंतर स्थानिक नेत्यांनी भाजपला पराभूत करायचे झाल्यास सर्व विरोधी पक्षांनी आघाडी करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आताही मुलाखतीत आतिषी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

आतिषी म्हणाल्या, आम आदमी पक्ष गतीने राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे चालला आहे. आपने सध्या २०२७ मध्ये पंजाब, गुजरात आणि गोवा या राज्यांतील विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे आम्ही त्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. येथील जनता काँग्रेसवर विश्वास ठेवते, पण ते निवडणून आल्यावर भाजपात जात आहेत.

त्यामुळे कदाचित येथील लोकांना थेट भाजपचेच बटन दाबावे असे वाटत असावे. अधिवेशनात सर्वात जास्त प्रश्न आपच्या आमदारांनी विचारलेले आहेत. राज्यातील सर्वच ठिकाणचे प्रश्न या आमदारांनी मांडले आहेत. दोनच आमदार निवडून आल्यानंतर तेही काही दिवसांत भाजपात जातील, असे म्हटले जात होते, पण ते अजूनही आपबरोबर आहेत. आघाडीचा धर्म हा मोठ्या पक्षाचा असतो, परंतु काँग्रेसने कधीही हा धर्म पाळलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

आठवडाभर मुक्काम

माजी मुख्यमंत्री आतिषी या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटना मजबूत करण्यावर गोव्यात काम करीत आहेत. शुक्रवारी त्या गोव्यात दाखल झाल्या असून आठवडाभर त्यांचा गोव्यात मुक्काम राहणार आहे. गावपातळीवर कार्यकर्त्यांच्या भेटी, लोकांच्या समस्या, तसेच मतदारसंघनिहाय बैठका, पदाधिकाऱ्यांच्या बैठका असा त्यांचा आठवड्यात कार्यक्रम राहणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT