Illegal Land Grabbing Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing: जमीन रुपांतरणाचा मुद्दा तापला, गोवा मुख्य सचिवांविरोधात काँग्रेस आक्रमक, विधानसभा प्रवेशद्वारावर झटापट

Illegal Land Grabbing: सचिवांना घेराव घालण्यासाठी आलेल्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी आत प्रवेश करण्यापासून रोखले. यावेळी त्यांच्यात झटापट झाली.

Pramod Yadav

Illegal Land Grabbing

पर्वरी: गोव्यातील जमीन रुपांतरणाचा मुद्दा पुन्हा गाजला असून, काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. शेत जमीन रुपांतरीत करुन तीच जमीन विकत घेतल्याप्रकरणी सचिवांना घेराव घालण्यासाठी काँग्रेस विधानसभा प्रवेशद्वारावर दाखल झाली. पण, पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना प्रवेशद्वारावरच अडवत आत जाण्यास मज्जाव केला. याच काँग्रेस नेते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

शेत जमीन रुपांतरीत करुन तीच जमीन विकत घेतल्याप्रकरणी गोव्याचे मुख्य सचिव पुनित कुमार गोएल अडचणीत सापडले आहेत. काँग्रेस या प्रकरणी चांगलीच आक्रमक झाली असून, काँग्रेसचा गोएल यांना घेराव घालण्याचा कार्यक्रम पोलिसांनी हाणून पाडला.

सचिवांना घेराव घालण्यासाठी काँग्रेस नेते प्रवेशद्वारावर दाखल झाले पण, त्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना आत प्रवेश करण्यापासून रोखले. यावेळी त्यांच्यात झटापट झाली.

काँग्रेसकडून यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सोशल मिडिया सेल प्रमुख अमरनाथ पणजीकर, हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा, सचिव सुनील कवठंणकर आणि मोठ्या प्रमाणवर इतर नेते उपस्थित होते.

आक्रमक काँग्रेस नेत्यांना पोलिसांचे कड भेदून पुढे जाण्याचा प्रयत्न केला खरा पण पुढे लोखंडी गेटसमोर असलेल्या पोलिसांनी त्यांना विधानसभा प्रांगणात जाण्यास परवानगी नाकारली. आक्रमक काँग्रेस नेत्यांनी जब जब सीएम डरता है, पुलिस को आगे करता है, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

आक्रमक काँग्रेस नेत्यांनी विधानसभा प्रवेशद्वारावरच उपस्थित पत्रकारांना संबोधित केले. राज्यात मोठ्या प्रमाणावर जमीन रुपांतर सुरु असल्याचे अमित पाटकर म्हणाले. राज्य सरकार मात्र शांत असून, कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी याचवेळी पत्रकार परिषद घेत सचिव पुनित कुमार गोयल यांनी क्लिन चीट दिली. गोयल यांची विनाकारण बदनामी केली जात असून, राज्य सरकारच्या परवानगीनेच त्यांनी जमीन खरेदी केल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

SCROLL FOR NEXT