Amit Patkar News Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : ‘त्या’ आठ आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी; काँग्रेसचं आवाहन

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नेहमीच कर्नाटकला वरचढ केले आणि गोव्यातील भाजपचे नेते गप्प बसले, हे कागदपत्रे सिद्ध करतात, अशी टीका अमित पाटकर यांनी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

केंद्रीय जल आयोगाने डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्टच्या दिलेल्या मंजुरीला स्थगिती आणण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जलद पावले उचलली नाहीत तर काँग्रेस सर्व गोमंतकीयांना सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलन करेल, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली.

काँग्रेसमध्ये असताना म्हादईविषयी आवाज उठवणाऱ्या ‘त्या’ आठ पक्षबदलू आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले, हे आमदार गप्प का आहेत? कृषिमंत्री रवी नाईक यांना आता त्यांचे ‘जल निर्यात धोरण' रद्द करून ‘पाणी आयात धोरण' राबवावे लागेल, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता यांची उपस्थिती होती. आलेमाव म्हणाले, म्हादई आपली आई म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता प्रत्यक्ष कृती करून दाखवावी. राज्याची जीवनदायिनी म्हादईबाबत भाजपने नेहमीच तडजोड केली आहे. आगामी विधानसभा अधिवेशनाचे कामकाजाचे दिवस वाढवावेत आणि एक संपूर्ण दिवस म्हादई प्रश्नावर चर्चेसाठी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. विधानसभेत म्हादई जलतंट्यासंबंधी सर्व कागदपत्रे सरकारने सादर करावीत. या गंभीर मुद्द्यावर एकत्रितपणे भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी आमदारांशीही बोलणार असल्याचे आलेमाव यांनी सांगितले.

कर्नाटकात भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी येडियुरप्पा यांना पत्र लिहून म्हादईविषयी कर्नाटकशी तडजोड केली होती. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नेहमीच कर्नाटकला वरचढ केले आणि गोव्यातील भाजपचे नेते गप्प बसले, हे कागदपत्रे सिद्ध करतात, अशी टीका अमित पाटकर यांनी केली.

विनोद पालयेकर हेही जबाबदार

केंद्र सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय आम्ही शोधू. एकापाठोपाठ आलेल्या भाजप सरकारांनी नेहमीच म्हादईचा गळा घोटला जात असताना आनंदोत्सव साजरा केला आहे. म्हादईच्या गोंधळाला माजी जलसंपदा मंत्री विनोद पालयेकर हेही जबाबदार आहेत, असे आमदार फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT