Goa congress leader meet Rahul Gandhi to discus strategy for Goa Assembly Election  Dainik Gomantak
गोवा

विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसची खलबतं

गोव्यातील विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत काल बैठकपार पडली आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यासह (Goa) पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्‍वभूमीवर गोव्यातील विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत काल बैठकपार पडली आहे.या बैठकीत काँग्रेसकडे युतीसाठी आलेल्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली असून आगामी निवडणुकीच्या व्यूहरचनेबाबत राहुल गांधींनी मार्गदर्शन केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Goa congress leader meet Rahul Gandhi to discus strategy for Goa Assembly Election)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच कार्यकारी अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड काल दिल्लीला होते. या तिघांनाही राज्यातील सुरू असलेल्या घडामोडी तसेच युतीसंदर्भात आलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी बोलावून घेण्यात आले होते. ही निवडणूक स्वबळावर की युती करून लढविण्यावरूनच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. भाजपला सत्तेवरून हटविण्यास युती हाच पर्याय आहे अशी बाजू यावेळी मांडण्यात आली असून आगामी निवडणुकीत पक्षाची रणनीती काय असावी तसेच कोणत्या मुद्यांवर प्रचारावर भर दिला जावा यासंदर्भात सखोल चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे 30 रोजी गोव्यात येत असून युतीचा प्रस्ताव दिलेल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली आहे.

दरम्यान, गेले कित्येक महिने काँग्रेसबरोबरच्या युतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या गोवा फॉरवर्डला हिरवा कंदील न मिळाल्याने त्यांनी गोवा तृणमूल काँग्रेसच्या प्रशांत किशोर यांच्याशी बोलणी केली होती. ही बोलणी सुरू असताना तृणमूल काँग्रेसने पक्षात प्रवेश करण्याची अट घातल्याने ही बोलणी फिस्कटली. आता पुन्हा काँग्रेसशीच युतीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी यासाठी पुढाकार घेऊन युती आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत गोवा फॉरवर्डशी युती करण्यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT