Goa Congress held protest at Mapusa Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेसच्या आंदोलनाचा तडका

म्हापशात निदर्शने : आठवडी बाजारात चुलीवर तळली भजी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Congress : गॅस दरवाढीच्या विरोधात गोवा प्रदेश महिला काँग्रेसतर्फे शुक्रवारी म्हापशात आठवडी बाजारातच मार्केट परिसरात चुलीवर भजी तळून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

महागाई वाढवून सरकार ‘अच्छे दिन’ कसे आणणार, असा सवालही या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, महिला कार्यकर्त्यांनी हातगाडीवर चिऱ्यांची चूल पेटवून त्यावर भजी तळल्या. या हातगाडीसमोर एक रिकामे गॅस सिलिंडरही ठेवले होते.

गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात प्रतीक्षा खलप, पार्वती नागवेकर, उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, अमरनाथ पणजीकर, विजय भिके यांनी सहभागी होत पंतप्रधान नरेेंद्र मोदी तसेच भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने इंधन, गॅसचे दर कमी करावेत, अशी मागणी काँग्रेसने केली.

यावेळी बीना नाईक म्हणाल्या की, ‘अच्छे दिन’ हे केवळ दिवास्वप्न राहिले आहे. या सरकारमुळे लोकांवर ‘बुरे दिन’ आले आहेत. सर्वसामान्य जनता महागाईला वैतागली आहे.

तीन मोफत सिलिंडर कुठे?

भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी तीन मोफत सिलिंडर देणार, असे आश्‍वासन दिले होते. ही सिलिंडर कुठे आहेत? सिलिंडरवरील सबसिडी का बंद केली, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.

काँग्रेसच्या काळात गॅस सिलिंडरचा दर 410 रुपये होता. मात्र, आता भाजपच्या काळात सिलिंडरची किंमत 1,117 रुपये झाली आहे. दरवाढीमुळे लोकांचे बजेट कोलमडले आहे, अशा शब्दांत नाईक यांनी भाजपवर निशाणा साधला.

स्मृती इराणींना ‘विस्मृती’?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या काँग्रेस पक्षाच्या राजवटीत रस्त्यावर उतरून अनेकदा आंदोलने वा निदर्शने करायच्या.

मात्र, आता भाजपच्या राजवटीत महागाईने उच्चांक गाठला असतानाही स्मृती इराणी यांना महागाईची ‘विस्मृती’ झाली का? त्या आता रस्त्यावर का उतरत नाहीत, असा सवाल यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT