गोंयकार आनी पर्यटकांखातीर खुशखबर! Goa-Mumbai अंतर आता वंदे भारत ट्रेनमुळे होणार कमी; रेल्वेमंत्र्यांचं आश्वासन

मुंबईहून गोव्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि कोकणवासीयांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
Goa-Mumbai Vande Bharat Express
Goa-Mumbai Vande Bharat ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa-Mumbai Vande Bharat Express: रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा-मुंबई रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहे. या परिस्थितीत कामाची पाहणी पूर्ण झाल्यानंतर रूटवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याचे त्यांनी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांना माहिती दिली आहे. यामुळे याचा सर्वाधिक फायदा कोकणवासियांना होणार आहे. तसेच मुंबई-गोवा प्रवास जलद होईल अशी आशा पुन्हा एकदा व्यक्त होऊ लागली आहे.

कोकणातील भाजपाच्या आमदारांनी केंद्रे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची राजधानी मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यान भाजपाच्या आमदारांनी मंत्री महोदय यांच्याकडे कोकणातील प्रवासांचा प्रवास वेगवान होण्यासाठी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेन सुरू केली जावी अशी मागणी केली आहे.

Goa-Mumbai Vande Bharat Express
Dr. Pramod Sawant : 2050 पर्यंत 100 टक्के अक्षय ऊर्जेचे लक्ष्य : मुख्यमंत्री

भाजपा आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड या आमदारांनी ही मागणी केली. आमदारांच्या या मागणीनंतर रावसाहेब दानवे यांनी मुंबई गोवा रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांना दिली.

तसेच या रेल्वे मार्गाची पाहणी झाल्यानंतर लगेचच वंदे भारत ट्रेन या रूटवर सुरू करू असे आश्वासन देखील यावेळी दिले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी दिलेले हे आश्वासन कोकणवासीयांसाठी महत्त्वाचे असून या रूटवर वंदे भारत ट्रेन धावली तर मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखकर होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com