Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोव्यात काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'गोवा रक्षण यात्रा'द्वारे जनसंपर्क अभियानावर मोठा भर

Goa Rakshan Yatra: आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसतर्फे ‘गोवा रक्षण यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसतर्फे ‘गोवा रक्षण यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश राज्यभरातील लोकांशी संपर्क साधणे आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत २७ जागा जिंकण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट साध्य करणे हा असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आलेमाव यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. ‘गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी’च्या अध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीला काँग्रेसने एकमताने पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाचे सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चोडणकर हे काँग्रेसचे निष्ठावान नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नेतृत्वातील या बदलाबाबत पक्ष एकजूट असून, आता २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करण्यावर पक्षाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. २०२७ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीची आवश्यकता असल्याचे युरी म्हणाले. विरोधी पक्षांच्या एकजुटीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले. पक्ष सोडून गेलेल्यांना (पक्षत्यागी नेत्यांना) पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही किंवा त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT