Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पुन्हा जवळ येणार? सरदेसाईंच्या नव्या पवित्र्याने दक्षिण गोव्याचे राजकीय गणित बदलले

Congress Goa Forward Alliance: काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्ये बोलणी सुरू असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी सरदेसाई यांची चर्चा सुरू असून ती लवकरच यशस्वी होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: आम आदमी पक्षाला जवळ करत काँग्रेसपासून अंतर राखणारे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विरोधी पक्षांची महाआघाडी हीच जनतेची मागणी असल्याचे सांगत काँग्रेसशी जुळवून घेण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. मात्र दक्षिण गोव्यात या घडामोडींकडे अद्याप सावधपणे पाहिले जात आहे.

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्ये बोलणी सुरू असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी सरदेसाई यांची चर्चा सुरू असून ती लवकरच यशस्वी होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर गोव्यातील काँग्रेस नेत्यांना सरदेसाईंवर टोकाची टीका न करण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत.

काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करण्यामागेही हेच कारण असल्याचा दावा त्याने केला. दरम्यान, या घडामोडींवर ‘आप’नेही सावध भूमिका घेतली आहे. पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल गोव्यात असतानाही त्‍यांनी सरदेसाईंच्या नव्या भूमिकेवर भाष्य केलेले नाही.

युरी-सरदेसाई मतभेद कायम

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्ये युतीची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई यांच्यातील मतभेद अद्याप कायम आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये प्रत्यक्ष मनोमीलन होईल का, याबाबत संभ्रमच आहे.

तिसरी आघाडी झाली असती तर?

गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ एकत्र आल्यास दक्षिण गोव्यात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले असते. त्यामुळे फातोर्ड्यात विजय सरदेसाई यांच्यासमोर आव्हान उभे राहण्याची, तर काँग्रेसला सासष्टीत फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nana Patekar Virat Kohli Fan: “विराट आऊट झाल्यावर जेवणाचा मूड जायचा”, नाना पाटेकर होते कोहलीचे डाय हार्ड फॅन; क्रीडा जगतानेही गमावला एक सच्चा चाहता

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून 3 टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर; पगारात किती वाढ होणार?

Nana Patekar Funeral In Pune: नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात होणार अंत्यसंस्कार; डोणजे गावातील शेतातच शेवटचे विधी करण्याची होती अभिनेत्याची इच्छा

Bee Attack: 50 फूट उंचीवर मधमाशांचा हल्ला; दोघे गंभीर जखमी, अग्निशमन दलाने केली थरारक सुटका

Luthra Brothers Bail: लुथरा बंधूंना सशर्त जामीन मंजूर, प्रत्येकी लाखाचा जातमुचलका; देश सोडण्यास मनाई

SCROLL FOR NEXT