Goa Congress President Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेस आपल्या शब्दावर ठाम: चोडणकर

पक्षांतर करणाऱ्यांना तिकीट नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर अले आहेत. प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने देखील आपले उमेदवार जाहीर केले असून; पक्षांतर करणाऱ्यांना तिकीट नाकारून, नव्या आणि तरुण चेहऱ्यांना जास्तीत जास्त तिकिटे देऊन जनतेला दिलेले एक आश्वासन पूर्ण केले आहे. (Goa Congress fulfills its promise Statment by Girish Chodankar)

असे GPCC अध्यक्ष गिरीश चोडणकर Girish Chodankar माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे Goa Congress 80 टक्के उमेदवार हे ताजे चेहरे आहेत. यापूर्वी 37 पैकी केवळ 6 उमेदवार आमदार आहेत.

निम्मे उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक Goa Assembly Election लढवत आहेत आणि उमेदवारांचे सरासरी वय 48 वर्षे आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर मंत्र्यांचा समावेश असलेला मोठा खाण घोटाळा काँग्रेस येत्या काही दिवसांत उघड करेल, असेही त्यांनी जाहीर केले.

तसेच, सरकारी अधिकार्‍यांनी निवडणूक काळात कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे. असे बोलत सरकारवर Goa Government निशाणा साधला, शिवाय सरकारच्या इशार्‍यावर नाचू नये; अन्यथा काँग्रेस सरकार आल्यानंतर आम्ही कडक पावले उचलू असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT