Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: विधानसभेसाठी काँग्रेस- गोवा फॉरवर्ड युती आवश्यक- दत्ता नायक

Goa Political Alliance: २०२२ पासून गोवा फॉरवर्ड हा काँग्रेसच्या आघाडीचा भाग आहे. विजय सरदेसाई हे अजूनही ते मान्य करतात.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी : २०२२ पासून गोवा फॉरवर्ड हा काँग्रेसच्या आघाडीचा भाग आहे. विजय सरदेसाई हे अजूनही ते मान्य करतात. मात्र, सध्या या दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खजिनदार दत्ता दामोदर नायक यांनी काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्यातील युती आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

काँग्रेसच्या खजिनदारपदी नियुक्ती झाल्यानंतर नायक यांनी प्रथमच उघडपणे आपली भूमिका मांडली.

नायक म्हणाले की, केवळ या दोन पक्षांमध्येच नव्हे, तर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचाही युतीत समावेश होणे आवश्यक आहे. देशातील ‘इंडी’ आघाडीच्या धर्तीवर गोव्यात युतीचा प्रयोग केला, तर भाजपविरोधात प्रभावी लढा देता येऊ शकतो, असेही नायक यांनी सांगितले.

मात्र, हे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसनेही लोकांसाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत. इंदिरा गांधी यांसारख्या नेत्यालाही पराभवास सामोरे जावे लागले होते. शेवटी लोक प्रशासनामागील हेतूवरून पक्षाची पारख करतात. आता भाजपचा हेतू भ्रष्टाचार असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे, असेही नायक म्हणाले.

पक्षबदलूंना लोक धडा शिकवतील

दिगंबर कामत यांच्यासह सर्व पक्षबदलूंना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार धडा शिकवतील. पक्ष बदलणे ही गंभीर चूक आहे. पक्षांतर म्हणजे केवळ पक्ष बदलणे नव्हे, तर आपली निष्ठा व तत्त्वे सोडून देण्याचे प्रतीक आहे, असेही नायक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT