Goa Congress on Smart City Work Panaji Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: स्मार्ट सिटीच्या कामाबाबत विविध खात्यांनी कायद्यानुसार निर्णय घ्यावेत; काँग्रेसची मागणी

पोलिस, आरोग्य खाते, दक्षता आयोगाला दिले निवेदन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Congress on Smart City Work Panaji: पणजीतील स्मार्ट सिटीअंतर्गत कामांविषयी काँग्रेसने गुरुवारी निवेदन सादर केले. या निवेदनामागे संबंधित खात्याकडे आपापल्या कायद्यांतर्गत हक्क आहेत, त्याचा वापर करावा.

या प्रशासकीय कार्यालयांना ही कामे दिसत नाहीत काय? याची आठवण करून देण्यासाठी हे निवेदन दिल्याची माहिती काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी दिली.

काँग्रेसने पोलिस अधीक्षक, दक्षता आयोग, आरोग्य संचालनालय, पणजी प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिका, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात गोम्स यांच्यासह ॲड. लवेनिया डिकॉस्ता, जॉन नाझारेथ आदींचा समावेश होता.

गोम्स म्हणाले, स्मार्ट सिटीची 49 कामे शहरात सुरू आहेत. ती कामे कशापद्धतीने सुरू आहेत, हे अनेकांना माहीत नाही. त्यामुळे प्रत्येक खात्याला आठवण करून देण्याचे काम आम्ही केले. या खात्यांना कायद्यांचा वापर करावा.

आरोग्य खात्याने सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार पाणी प्रदूषण कसे थांबवावे, लोकांचे आरोग्य कसे सांभाळावे हे पाहावे. तसे होत नाहीय. लोकांचे जीवन धोक्यात असेल, तर अधिकाराचा वापर करता येतो याची आठवण उपजिल्हाधिकाऱ्यांना करून दिली आहे.

गोम्स म्हणाले, महानगरपालिका आपले हात झटकत आहे. आयुक्तही त्यांच्या हक्कांचा वापर करत नाहीयत. अधिकाऱ्यांकडून जे गैरप्रकार घडतात, ते तपासण्याचे हक्क दक्षता आयोगाला आहेत. आम्ही निवेदन देऊन त्यांना ते लक्षात आणून दिले आहे.

अमृत मिशन आणि स्मार्ट सिटी अंतर्गत जी कामे चालू आहेत त्यांचा दर्जा गंभीरपणे तपासला पाहिजे. उद्या काही अघटित घडले, तर आम्हाला माहितीच नाही, असा कांगावा कुणी करू नये. म्हणून हे निवेदने दिल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope Today: ज्येष्ठ पूर्णिमा व्रताला बनतोय अत्यंत दुर्मिळ योग; शनिवारी 'या' राशींच्या पदरात पडणार सुखाचे क्षण, नोकरीत पदोन्नतीचे प्रबळ संकेत!

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

SCROLL FOR NEXT