Goa Congress Delegation Meet Goa Cm Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : समस्या पाहून दुर्लक्ष करू नका, दोषींवर कठोर कारवाई करा!

काँग्रेसच्या कानपिचक्या : शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दैनिक गोमन्तक डिजिटल

सांकवाळ येथे पाण्याच्या टँकरमधून सांडपाणी वाहून नेण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही सरकारी खात्यांनी याची गंभीर दखल घेतलेली नाही. केवळ समस्या पाहून चालणार नाही, दोषींवर कारवाईही व्हायला हवी. विधानसभेत अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याची बाब काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी ‘महालक्ष्मी’ या सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, सुभाष फळदेसाई, अमरनाथ पणजीकर, ॲड. जितेंद्र गावकर, सावियो डिसिल्वा, ॲड. श्रीनिवास खलप, कॅप्टन विरिएतो फर्नांडिस, नौशाद चौधरी, विवेक डिसिल्वा, सुदिन नाईक, ओलेंसियो सिमोईश व इतरांचा समावेश होता.अमरनाथ पणजीकर म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित असल्याचे दिसते. परंतु मंत्री व्यवस्थित कामे करत नाहीत. परंतु सध्या मंत्र्यांकडून ‘मिशन टोटल कमिशन'' काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

पिण्याचे पाणी भेसळयुक्त

कॉंग्रेसचे मीडिया सेल प्रमुख अमरनाथ पणजीकर म्हणाले की, आम्ही पणजीतील सांडपाण्याचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. येथे मलनिस्सारण आणि पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीतील पाणी एकमेकांत मिसळत आहे. त्याकडे कोणतेही खाते गांभीर्याने पाहत नाही. कोणत्याही खात्यात कर्मचारी व्यवस्थित काम करीत नाहीत. काही मंत्र्यांमुळे स्मार्ट सिटीचे काम रखडले आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

  1. काँग्रेस शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी टँकर, तसेच मलनिस्सारणाचा विषय मांडला.

  2. टँकरबाबत सरकारने अगोदरच निर्णय घेतला आहे. जीआय टॅगिंग स्टेनलेस स्टिल टँकर वापरणे सुरू केले आहे.

  3. शिवाय ‘साबांखा’च्या प्रमाणपत्राशिवाय पाण्याची वाहतूक करता येणार नाही.

  4. जर कोणी प्रमाणपत्राशिवाय वाहतूक करत असेल, तर त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय झाला आहे.

  5. इतर काही विषय त्यांनी निदर्शनास आणले असून, त्यात मी लक्ष घातले आहे.

  6. विधानसभा अधिवेशनातील प्रश्‍नांना संबंधित मंत्र्यांनी उत्तरे द्यायला हवीत.

...अन्यथा सर्व टँकर रोखणार

सर्व संबंधित विभाग आणि भागधारकांची बैठक बोलवावी, तसेच राज्यातील टँकर व्यवसायावर देखरेख करण्यासाठी नोडल एजन्सी नेमावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास काँग्रेस कार्यकर्ते राज्यातील सर्व टँकर रोखतील, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

SCROLL FOR NEXT