Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : आमदार राखता येत नाहीत, खुर्ची सोडा! ; कार्यकर्ते संतापले

गिरीश, पाटकर व गुंडू राव तोफेच्या तोंडी

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळेकर

मडगाव : दिगंबर कामत आणि मायकल लोबो काँग्रेस आमदारांना फोडत आहेत, याची पूर्णपणे जाणीव असूनही गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्यासह सर्व स्थानिक नेते हातावर हात ठेवून गप्प राहिले. त्यामुळेच काँग्रेसचे पतन झाले अशी तीव्र भावना राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे नेत्यांनी या पतनाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचा राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरू लागली आहे.

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी अध्यक्ष नजीर खान यांनी या प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना जबाबदार ठरवून पक्ष चालविता येत नाही तर खुर्ची सोडा असा सल्लावजा इशारा दिला. तर काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्यावर पक्षफुटीची जबाबदारी फोडली. या दोघांनीही मायकल लोबो यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना उमेदवारी विकल्या असा सनसनाटी आरोप केला.

आठ काँग्रेस आमदारांना फोडून तो गट भाजप पक्षात विलीन करण्याचे प्रयत्न सुरू होते. केवळ दोन आमदार मिळत नाहीत म्हणून ही फूट घडून येत नव्हती. अशा परिस्थितीत या दोन आमदारांना अडवून ठेवण्यासाठी पाटकर आणि चोडणकरांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. उलटपक्षी ते पत्रकार परिषद आणि ट्विटबाजी करण्यात दंग होते. फ्रान्सिस सार्दिन यांनीही त्यांच्याच हातावर हात मारला. नेत्यांबद्दल आता काँग्रेस कार्यकर्ते चीड व्यक्त करीत आहेत.

मायकल आणि इतरांना काँग्रेस पक्षात कुणी आणले? ज्यांनी त्यांना काँग्रेस पक्षात आणले, त्यांनी आजच्या या पतनाची जबाबदारी घ्यायला नको का? या नेत्यांच्या चुकीच्या निर्णयाची किंमत आज पक्ष मोजत आहे. असे जरी असले तरी निष्ठावान कार्यकर्त्यांचा जोरावर काँगेस पक्ष फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून उभा होणार याची मला खात्री आहे

- एल्विस गोम्स, काँग्रेस नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update:सकाळी 10 पर्यंत पाळीत सर्वाधिक, तर ताळगावमध्ये सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT