South Goa: Cycle Morcha Rally Dainik Gomantak
गोवा

Goa: इंधन दरवाढी विरोधात कॉग्रेसची मडगावात सायकल रॅली

या रॅलीत मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar).

दैनिक गोमन्तक

सासष्टी: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज कॉग्रेस पक्षातर्फे (Congress Party) भाजप सरकारच्या (BJP Government) विरोधात घोषणा देत मडगावमधील लोहिया मैदानापासून (Lohia Ground in Madgaon) ते दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत (South Goa Collectorate Office ) सायकल मोर्चा रॅली (Cycle Morcha Rally) काढण्यात आली. कच्चा तेलाचे दर कमी असूनही सरकार पेट्रोल (Petrol), डिझेल आणि घरगूती सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली असून केंद्र सरकारने (Central Government) याची दखल घेऊन त्वरित पेट्रोल 35 रुपये प्रतिलीटरच्या दरात द्यावे, अशी मागणी कॉग्रेस पक्षातर्फे करण्यात आली.

या रॅलीत मडगावचे आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर. सरचिटणीस सुभाष फळदेसाई, दामू शिरोडकर, मडगाव पालिकेच्या उप नगराध्यक्षा दीपाली सावळ, गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक, दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष जॉ डायस, उपाध्यक्ष दीपक खरंगटे, मडगाव काँग्रेस गटाचे अध्यक्ष गोपाळ नाईक, डॉरिस टेक्सेरा, अविनाश शिरोडकर व इतर कार्यकर्ता सहभागी झाले होते.

महागाईच्या विरोधात जे आंदोलन करत होते, तेच सरकार आज केंद्रात सत्तेवर आहे. तेव्हा पेट्रोल, डिझेल गॅस सिलिंडरचे दर होते. तेच दर आजघडीला गगनाला भिडले आहे. भाजप सरकारने पेट्रोलचे दर 60 रुपयाच्या वर जाण्यास देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. पण, आज पेट्रोलचे दर 100 झालेले आहे. ज्या महिला इंधन दरवाढीच्या विरोधात आवाज उठवित होत्या त्या महिला कुठे गेल्या आहेत, असा सवाल आमदार दिगंबर कामत यांनी उपस्थित करुन नागरिकांना फसवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने त्वरित इंधन दरवाढ कमी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT