Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: भाजपने आम्हाला देशभक्ती शिकवण्याची गरज नाही

देशाच्या अमृतमहोत्सवाआडून भाजप आपला प्रचार करतेय

Sumit Tambekar

गोवा काँग्रेसने आज भारतीय जनता पक्ष राबवत असलेल्या 'हर घर तिरंगा' कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमातून भाजपने केवळ स्वत:ची जाहिरात सुरु केली आहे. त्यामूळे स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपली आहूती दिली ते या कार्यक्रमात कोठेही दिसत नाहीत. केवळ भाजप नेते आपलंच उद्दात्तीकरण करतायेत असे गोवा काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर म्हणाले. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

(Goa Congress criticizes BJP from Har Ghar Tricolor programme)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात स्वातंत्र्यसेनानींचा भाजपला सोयिस्करित्या विसर पडला आहे. कारण ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिले त्या क्रांतिकारकांचा उल्लेख भाजपकडून झालेलाच नाही. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्यांना जाणीवपूर्वक बाजूला करत भाजप केवळ आणि केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी याचा वापर करत आहे. काँग्रेस इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कधीच करत नाही. भाजपने मात्र हेच केलं आहे. असा आरोप यावेळी काँग्रेसने केला आहे.

या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांचे ऋण काँग्रेस कधीच विसरु शकत नाही. त्यामूळे भाजपने आम्हांला देशभक्ती शिकवण्याची गरज नाही. अमृत महोत्सव भारताच्या स्वातंत्र्याचा मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्यांचे फोटो पोस्ट करण्याऐवजी भाजपचे नेते सध्या स्वतःचे फोटो दाखवत आहेत. त्यांच्या वागण्यात कसली देशभक्ती आहे, असा सवालही अमरनाथ पणजीकर यांनी केला. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

म्हापसा पोलीसांचा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम

कोलवाळ येथील लीला गार्डन्स येथे आज सकाळी गोवा पोलिसांनी म्हापसा उपविभागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम भारत सरकारने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केले्या नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.

याबाबात माहिती देताना म्हापसा पोलिसांनी सांगितले की, लोकांचा इतिहास, संस्कृती यांचे वेगळेपण समोर आणता यावा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याबाबत माहिती देताना म्हापसा पोलीस उपाधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की, ज्यांनी भारताची क्षमता ओळखण्यात आणि आत्मनिर्भर भारत (आत्मनिर्भर भारत) चे भारत 2.0 चे व्हिजन आणखी मजबूत करण्यात मदत केली. त्या सर्वांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्या सर्वांना अभिवादन या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

SCROLL FOR NEXT