Goa Congress: अधिकाऱ्यांना बळीचा बकरा करणारे मंत्रीही अन्ननासाडीला जबाबदार

तूरडाळ सडण्यास केवळ एक अधिकारी जबाबदार नाही - काँग्रेसचा घणाघात
Turdal and sugar
Turdal and sugarDainik Gomantak

गोव्यात 241 टन तूरडाळ सडल्याच्या घटनेनंतर 10.3 मेट्रिक टन साखरही खराब झाल्याची घटना समोर आली होती. यामूळे राज्यात सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षांनी जहरी टिका करायला सूरु केली आहे. आर जी पी, काँग्रेस आणि इतर पक्ष राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

(Minister also responsible for Turdal sugar scam Goa Congress)

Turdal and sugar
Goa Update: पणजी येथील जुना मांडोवी पूल उद्या 6 तासांसाठी बंद राहणार आहे

काल म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी या प्रकरणात तत्कालीन संचालक सिद्धीविनायक नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गोवा काँग्रेस या प्रकरणावरुन आता चांगलीच आक्रमक झाली असून, केवळ एकच अधिकारी या प्रकरणाला जबाबदार नाही. तर या प्रकरणास तत्कालीन मंत्रीही जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे.

याबाबत गोवा काँग्रेसने म्हटले आहे की, या प्रकरणाबाबत आम्ही संपुर्ण माहिती 'माहिती हक्क कायद्याअंतर्गत' घेत आहोत. ती मिळाली की, यात आणखी कोण सामील आहे. यावरुन गोवा सरकारचे पितळ उघडे पडल्याखेरीज राहणार नाही. असे ते म्हणाले.

Turdal and sugar
Vasco New: भारतीय तटरक्षक गोवा प्रदेशने अनेक घरांवर फडकवला तिरंगा

लाखो रुपयांच्या अन्न नासाडीत तत्कालीन नेते ही जबाबदार असून केवळ अधिकाऱ्यांना बळीचा बकरा करणारे मंत्रीही या अन्ननासाडीला जबाबदार आहेत असा ही आरोपे काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी केला. गोव्यातील अन्ननासाडीचे प्रकरणावरुन गोवा काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

म्हापसा पोलीसांचा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम

कोलवाळ येथील लीला गार्डन्स येथे आज सकाळी गोवा पोलिसांनी म्हापसा उपविभागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम भारत सरकारने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केले्या नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.

याबाबात माहिती देताना म्हापसा पोलिसांनी सांगितले की, लोकांचा इतिहास, संस्कृती यांचे वेगळेपण समोर आणता यावा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याबाबत माहिती देताना म्हापसा पोलीस उपाधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की, ज्यांनी भारताची क्षमता ओळखण्यात आणि आत्मनिर्भर भारत (आत्मनिर्भर भारत) चे भारत 2.0 चे व्हिजन आणखी मजबूत करण्यात मदत केली. त्या सर्वांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्या सर्वांना अभिवादन या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com