Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: मुख्यमंत्र्यांचे विधान धार्मिक कलहाचे; धर्मप्रसार करायचा असल्यास सत्ता सोडा, आम्ही पाठिंबा देऊ

पाटकर यांचा आरोप : मूळ मुद्यांपासून लोकांना ठेवतात दूर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress मुख्यमंत्र्यांनी गोव्यात सर्व धर्म, जातीचे लोक सलोख्याने राहतात याचा आदर्श लोकांसमोर ठेवायला हवा होता. तसे न करता मध्यप्रदेशात जाऊन ते सनातन हिंदू धर्माची वकिली करतात हे चुकीचे आहे.

ती या भूमीची शिकवण नाही. मुख्यमंत्र्यांच्या अशा विधानातून राज्यातही धार्मिक कलहाचे विष पेरले जात आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी बुधवारी (ता.१३) केला.

लोकांचे लक्ष त्यांना भेडसावणाऱ्या मूळ मुद्यांवरून इतरत्र वळवण्यास अशी विधाने उपयोगी पडतात आणि भाजपकडून तसे केले जाणे अपेक्षितच आहे, असे पाटकर म्‍हणाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. जितेंद्र गावकर व सुदिन नाईक पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

‘त्यांना’ हे शोभत नाही!

प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर म्हणाले, राज्य घटनेने सर्व धर्माचा आदर करा, असे तत्त्व दिले आहे. त्या घटनेची शपथ घेऊन मुख्यमंत्रिपदी आलेल्या व्यक्तीला एकाच धर्माचा उदोउदो करणे शोभा देत नाही.

मुख्यमंत्र्यांना धर्मप्रसाराचे काम करायचे असल्यास त्यांनी सत्ता सोडून तसे करावे. आम्हीही त्यांना पाठिंबा देऊ. गोवा हिंदूबहुल असूनही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धती आहे.

महामार्ग रुंदीकरणातून पोरस्कडेचे माऊली मंदिर वाचवण्यासाठी भाजपचे राज्य सरकार पुढे आले नव्हते. केंद्र सरकारने ते वाचवले.

आताही भोम येथील मंदिर वाचवण्यासाठी भाजप सरकार पुढे येत नाही. पेडण्याच्या थीम पार्कला मंत्री माविन गुदिन्हो दामटवत आहेत. त्या जागी असलेल्या भूतनाथ देवस्थानचे पावित्र्य प्रकल्पामुळे धोक्यात येणार आहे.

- ॲड. जितेंद्र गावकर, कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT