Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचाराचे आरोप; चौकशी करा, काँग्रेसचे भाजपला चर्चेचे आव्हान

Goa Congress Demands Corruption Investigation: काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आदिवासी कल्याण खात्यातील कथित भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता कागदोपत्री पुराव्यांनिशी समोर आणत असून, या आरोपांवर भाजप सरकारने काँग्रेसशी समोरासमोर चर्चा करावी, असे आव्हान प्रदेश काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी शनिवारी दिले.

काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जनार्दन भंडारी, माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष उदय च्यारी आणि सांगेतील काँग्रेस नेते तथा माजी लेखा संचालक सत्यवान तळवडकर उपस्थित होते. पणजीकर यांनी आदिवासी कल्याण खात्यातील आर्थिक अनियमिततेवरून संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांवर टीका केली.

मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून आदिवासी समाजाची फसवणूक होत असल्याचे आरोप त्यांनी केले. च्यारी म्हणाले की, खात्याच्या मंत्र्यांनी अधिकारांचा गैरवापर केला आहे. खर्चाची बिले वेगवेगळ्या भागांत विभागून दाखविण्यात आली असून, कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रियाही टाळण्यात आली. मर्जीतील लोकांना कामे देण्यात आली, तर अनेक बिलांमध्ये अव्वाच्या सव्वा दर दाखविण्यात आले आहेत.

माहिती देण्यास टाळाटाळ का?

आदिवासी कल्याण खात्याच्या आयुक्तांकडे विविध कार्यक्रमांवरील खर्चाची माहिती मागितली होती; मात्र ती पूर्णपणे देण्यात आलेली नाही. माहिती अधिकाराखाली माहिती मागविल्यानंतर खात्याचे संचालक ‘आपणास त्रासात टाकू नका,’ अशी विनंती करीत होते. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याचे स्पष्ट होते, असे सत्यवान तळवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: 'दहशतवाद्यांना दीड कोटी पाठवले', एटीएस अधिकारी बनून सायबर ठगांनी साधला डाव; 'डिजिटल अरेस्ट'च्या प्रकारानं खळबळ

Goa Politics: राजकीय संन्यास सोडून मनोज परब पुन्हा मैदानात; 'आरजी'तील परब-बोरकर संघर्षाला नवे वळण

खरी कुजबुज: खाकी वर्दीचा धाक आता संपला?

Mexico Violence: ड्रग माफियाच्या अटकेनंतर रक्तरंजित धुमश्चक्री, अंदाधुंद फायरिंगमध्ये 11 जणांचा मृत्यू; मेक्सिकोत गुन्हेगारी टोळीचा हैदोस!

Crime News: आसगाव प्रकरणाची पुनरावृत्ती? आश्वे-मांद्रेतील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT