Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival: मडगाव कार्निव्हल मिरवणुकीत लहान मुलांच्या जिवाशी खेळ, आयोजकांविरोधात काँग्रेसची तक्रार

Goa Congress: कार्निव्हलच्या आयोजनातील त्रुटींवर काँग्रेसची टीका; सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी

Ganeshprasad Gogate

Goa Congress: बहुचर्चित अशा कार्निव्हल फेस्टिवलला पर्वरीत शुक्रवारीकर्टन रेझरने दिमाखात सुरुवात झाली. शनिवारी 10 फेब्रुवारीला राजधानी पणजीत कार्निवल दिमाखात संपन्न झाल्यावर रविवार 11 फेब्रुवारीला मडगावात कार्निव्हल परेड पार पडली.

या परेड वेळी सरकारी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली.

काँग्रेसचे सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी खजिनदार ऑरविल दौराद आणि ओलेन्सिओ सिमोयस यांच्यासह दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाळे यांच्याकडे तक्रार सुपूर्द केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार पर्यटन खाते आणि मडगाव नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा सरकारने आयोजित केलेल्या कार्निव्हल मिरवणुकीसाठी आलेल्या प्रेक्षकांची कोणतीही व्यवस्था केली नव्हती.

आलेल्या प्रेक्षकांना उंच आणि संरक्षक कठडा नसलेल्या भिंतीचा आधार घेत उंचावर बसून परेड पाहावी लागली. समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये लहान मुले आणि लोक जमिनीपासून सुमारे 15 ते 20 फूट उंच असलेल्या भिंतीवर धोकादायकपणे बसलेले दिसतात.

एवढ्या उंचीवरून पडणे जीवघेणे ठरू शकते, असे काँग्रेस पक्षाने आपल्या तक्रार पत्रात नमूद केले आहे.

काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अर्धवट कोसळलेल्या भिंतीवर लहान मुले बसलेली स्पष्टपणे दिसत असलेला व्हिडिओ अपलोड केला असून दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक आणि दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाईची मागणी केली आहे, असे पत्रात पुढे म्हटले आहे.

लोकांचा; विशेषतः लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही ही अधिकृत तक्रार तुमच्यासमोर सादर करत आहोत.

गोवा सरकारचे पर्यटन खाते, मडगाव नगरपालिका, गोवा पोलीस तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सहयोगी विभागांच्या अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा आणि कर्तव्यात दुर्लक्ष झाले आहे, असे मोरेनो रिबेलो यांनी त्यांच्या तक्रार पत्रात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT