Panaji News : लोकोत्सवाच्या आयोजनाचा खर्च वाढतोय

Panaji News : गेल्या वर्षी स्टॉलच्या भाडेपट्टीतून ४६ लाख ८० रुपये महसूल
Panaji
PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, दरवर्षी कला अकादमी परिसरात होत असलेल्या लोकोत्सवाच्या आयोजनासाठी मागील पाच वर्षांत खर्च वाढत असल्याचेच आकडेवारीवरून दिसून येते.

Panaji
Goa Drugs Case: राज्यात ड्रग्ज तस्करीत वाढ; विदेशी नागरिकांसह स्थानिक युवकांचा सहभाग

लोकोत्सवात उभारण्यात येणाऱ्या स्टॉलच्या भाडेपट्टीतून गतवर्षी (२०२३) ४६ लाख ८० हजारांचा महसूल मिळाल्याचे लेखी उत्तर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिले आहे.

आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी लोकोत्सव आणि कोसंबी विचार महोत्सवावर मागील पाच वर्षांत किती खर्च झाला याची आकडेवारी मागितली होती. तसेच कोरोनामुळे २०२१ व २२ मध्ये लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

तर २०२३ मध्ये कोसंबी विचारमहोत्सव पार पडला नाही, त्यामुळे खर्चच झाला नसल्याचेच स्पष्ट होते. गतवर्षीच्या लोकोत्सवासाठी गोव्यातून स्टॉलधारकांसाठी ५२६ स्वयंसाह्य गटांचे अर्ज आले होते, त्यापैकी ३१२ गटांना स्टॉल देण्यात आले होते.

तर परराज्यांतून २१९ जणांचे अर्ज आले होते, परंतु २८८ व्यवसायिकांना स्टॉल देण्यात आले. या स्टॉलच्या भाडेपट्टीतून ४६ लाख ८० रुपये महसूल मिळाला.

गेल्या पाच वर्षांतील खर्च

लोकोत्सवासाच्या आयोजनासाठी राज्य सरकारने २०१९ मध्ये १ कोटी १६ लाख ७४ हजार ४८१ रुपये, २०२० च्या आयोजनासाठी ३ कोटी ६ लाख ७२ हजार ४३७ रुपये, २०२१ व २०२२ नाही. २०२३ साठी ३ कोटी ४५ लाख ४७ हजार ८८२ रुपये खर्च झाला आहे.

डीडी कोसंबी विचार महोत्सवावर कला व संस्कृती खात्याने केलेला खर्च असा : २०१९ मध्ये १०.५६ लाख रुपये, २०२० मध्ये १.८३ लाख, २०२१ मध्ये १८ हजार, २०२२ मध्ये २.१५ आणि २०२३ मध्ये काहीच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com