Congress  Dainik Gomantak
गोवा

Goa: कॉंग्रेस उमेदवारीसाठी आत्तापासूनच संघर्ष सुरु...

कॉंग्रेसची (Congress) पारंपारिक 4 ते 5 हजार मते धरल्यास आपला विजय नक्की आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: सांतक्रुझ मतदारसंघात माजी मंत्री (Minister) व्हिक्टोरिया फर्नांडीस यांचे पुत्र रुडाल्फ फर्नांडीस हे येथील कॉंग्रेस उमेदवारीचे प्रबळ दावेदार समजले जात असतानाच कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सांतक्रुझमधील तीन नेत्यांनी रुडाल्फ यांच्या उमेदवारीच्या विरोधात आवाज उठवणे सुरु केल्यामुळे सांताक्रुझमध्ये (SantaCruz) कॉंग्रेस उमेदवारीसाठी आत्तापासूनच संघर्ष सुरु झाला आहे. कॉंग्रेसचे गोवा मुख्य निवडणूक निरीक्षक व माजी केंद्रिय गृहमंत्री (Union Home Minister) पी चिदंबरम (P Chidambaram)यांनी काही दिवसापुर्वी सांताक्रुझ येथे गट समितीची बैठक घेतली होती.

त्या बैठकीचे आयोजन व नियोजन रुडाल्फ फर्नांडिस यांनीच केले होते. गेले काही महिने पणजीत कॉंग्रेस जी आंदोलने करते, पत्रकार परिषदा घेतल्या जातात त्यावेळी रुडाल्फ हेच उपस्थित असतात. गेल्या निवडणूकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष राहीले व 5 हजाराच्यावर मतेही मिळवली होती.

मात्र काल माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस, कॉंग्रेसचे कार्यकर्ते टॉमी आॅलिवोरा व कॉंग्रेस पक्षाच्या संघटन कामात नसलेले मात्र कॉंग्रेस उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उद्योगपती राजेश खंवटे यांनी एकत्र येऊन आपल्या तिघांपैकी एकाला सांतक्रुझमध्ये उमेदवारी द्यावी. तरच कॉंग्रेससाठी काम करु. असा जणू इशाराच कॉंग्रेस पक्षाला दिला आहे. त्यामुळे सांतक्रुझ मतदारसंघात उमेदवार निवडताना कॉंग्रेसची बरीच दमछाक होणार असे दिसते.

ते तर बाबूशचे लोक:

सांताक्रुझमधून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर दावा करणारे वरील तिन्ही लोक हे पणजीचे आमदार (MLA) बाबूश मोन्सेरात यांचे समर्थक आहेत. परवा ताळगावमध्ये कॉंग्रेस कार्यालयाच्या उदघाटनावेळी आपण बाबूश विरोधात भाषण केल्याने बाबूश यांनीच वरील तिघांना आपल्या विरोधात काम करण्यास सांगितले आहे.

या तिन्ही लोकांनी सांताक्रुझमधील लोकांसाठी काहीच केलेले नाही. कोरोना महामारीच्या वेळी आपण 10 हजार लोकांना जिवनावश्‍यक वस्तू वाटल्या होत्या. गेली अनेक वर्षे आपण येथे काम करत आहे. आपली आई माजी मंत्री व्हिक्टोरिय. फर्नांडीस यांनी अनेक वर्षे सांताक्रुझच्या लोकांची सेवा केली आहे.

टोमी आॅलिवेरा यांच्या मुलीला आपण जि.पं,. सदस्य (ZP)म्हणून निवडून आणले होते. गेले काही महिने कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी सभा बैठका आपण घेत आहे. मागील निवडणुकीत (election)स्वताच्या हिमतीवर साडेपाच हजार मते मी घेतली होती. तसेच मगोचे प्रकाश नाईक यांना पडलेली 2700 मते यावेळी आपणास मिळतील. त्यात कॉंग्रेसची पारंपारिक 4 ते 5 हजार मते जमेस धरल्यास आपला विजय नक्की आहे.

आम्ही दहा आमदार कॉंग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (BJP ) दाखल झाला होतो त्यावेळी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हांला आगामी निवडणूकीत पक्षाची उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सांताक्रुझमधून आपणास भाजपची उमेदवार मिळणार यात तिळमात्र शंका नाही. आपणही भाजपच्या उमेदवारीवरच निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. अशी माहित सांतक्रुझ मतदारसंघाचे भाजप आमदार टोनी फर्नांडीस यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना फर्नांडीस म्हणाले की आपण सांतक्रुझमध्ये बेरच काम केले आहे, लोक आपल्यासोबत आहेत. त्यामुळे सर्वेत भाजपला येथे 50 टक्के संधी दर्शवली असली तरी प्रत्यक्ष घरोघरी सर्वे केल्यास लोक आपले काम सांगतील. असे फर्नांडीस यांनी सर्वेवर बोलताना सांगितले. आपण चांगले काम केल्याचे मुख्यमंत्री डॉं. प्रमोद सावंत यांनी सांताक्रुझ पोलिस स्थानक उदघाटनाच्यावळी जाहिर केले होते. त्यामुळे त्यांनी 40 टक्के आमदाराना उमेदवारी नाकारली जाईल असे जे म्हटले आहे ते लोकांच्या संपर्कात नसलेल्यांना आमदराबाबत . आपण नेहमीच लोकांच्या संपर्कात आहे. असे मुख्यमंत्र्याच्या 40 टक्के आमदाराना वगळणार! या वक्तत्व्यावर बोलताना फर्नांडीस म्हणाले.

सांताक्रुझ मतदारसंघात बरेच खड्डे पडलेले आहेत ते बुजवण्याचे काम सुरु होत आहे. आपण प्रत्यक्ष उपस्थित राहून कश्‍या प्रकारे खड्डे बुजवल्यास तेथे पुन्हा खड्डा पडणार नाही याचे मार्गदर्शन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांना करणार आहे. अशी माहित फर्नांडीस यांनी खड्ड्यांच्या विषयावर बोलताना दिली.

गोवा प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य निवडणूक निरीक्षक व माजी केंद्रिय गृहमंत्री पी चिदंबरम हे आजपासून गोवा दौऱ्यावर असून विविध मतदारंसघातील गट समित्यांच्या बैठका घेण्यास त्याना प्रारंभ केला आहे. त्यांच्यासोबत गोवा कॉंग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्यासह राज्यातील सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेते आहेत. कॉंग्रेसच्या सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यात चिदंबरम हे कॉंग्रेसची इतर पक्षासोबत होणाऱ्या संभाव्य युतीबाबात चर्ची करण्याची शक्यता नाही. संघटना बळकट करणे, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणे यावर चिदंबरम यांचा जास्त भर असणार असल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. चिदंबरम यांचा हा तीन दिवसाचा दौरा आहे मात्र तो एक दिवस वाढू शकतो.ते तीन दिवसात मोजक्याच बैठकांना उपस्थित राहणार असले तरी गोवा प्रभारी दिनेश राव हे 13 आॅक्टोंबर पर्यंत विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत.

गोव्यातील बैठकी:

  • युवा कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारीणीची बैठक पणजी, सेवा दल बैठक मडगाव, बाणावली कॉंग्रेस गट समीती बैठक

  • एनएसयुआयची बैठक पणजी, विविध विभागांच्या अध्यक्षांची बैठक पणजी, जिल्हा कार्यकारिणीची बैठक पणजी, संध्याकाळी मांद्रे व त्यानंतर शिवोली गट समितींची बैठक

  • सकाळी पणजीत मुख्य नेत्यांची बैठक, त्यानंतर संध्याकाळी हळदोणा व त्यानंतर म्हापसा गट समितीची बैठक

  • सकाळी पणजीत बैठक त्यानंतर संध्याकाळी मये व त्यानंतर थिवी गट समितीची बैठक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

SCROLL FOR NEXT