Goa Congress Dainik Gomantak
गोवा

गोवा काँग्रेसकडून आसामचे CM सरमा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; न्याय यात्रेवरील हल्ल्याचा निषेध

काँग्रेसकडून हाऊस-पणजी येथे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा पुतळा जाळण्यात आला.

Pramod Yadav

Goa Congress: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर हल्ल्याचा निषेध करत गोवा प्रदेश काँग्रेस समितीने मंगळवारी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला.

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, आमदार कर्लूस फेरेरा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, गोव्याचे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक प्रभारी तरन्नुम खान, युवा अध्यक्ष जॉयल आंद्रादे आणि एनएसयुआय अध्यक्ष नौशाद चौधरी, तसेच इतर नते उपस्थित होते.

काँग्रेसकडून हाऊस-पणजी येथे हिमंत बिस्वा सरमा यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी काँग्रेस समर्थक आणि नेत्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली.

मणिपूरपासून सुरू झालेल्या ‘भारत जोडो, न्याय यात्रेला राहुल गांधींना पाठिंबा मिळत असल्याने भाजपा घाबरला असल्याचा आरोप अमित पाटकर यांनी यावेळी केला.

"काँग्रेसला मिळत असलेला पाठिंबा आणि सरकार विरुद्ध लोकांची नाराजी बघता भाजप घाबरला आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोंधळलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यात्रेवर हल्ला केला आणि त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला," असे ते म्हणाले.

आसामचे अध्यक्ष भूपेन कुमार बोराह यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. एकीकडे ते रामराज्या विषयी बोलतात आणि दुसरीकडे त्यांनी राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखले, असे पाटकर म्हणाले.

काँग्रेस मजबूत होईल या भीतीने राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून थांबवण्यात आले, असे कार्लूस म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हुकूमशाही शासन चालवत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

आसाम सरकार सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरले असून यात्रेवर झालेल्या हल्ल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असे तरन्नुम खान यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT