Goa Congress Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील कलाकारांसोबत "कमिशन डील" सेट होत नसल्यानेच सरकारने त्यांना डावलले; मडगाव मैफिलीवर काँग्रेसचा घणाघात

Goa Congress: भाजपच्या खोट्या प्रचारात गोमंतकीयांनी वाहून जाऊ नये- दिव्या कुमार

Ganeshprasad Gogate

Goa Congress: "गोव्यातील प्रतिभावान कलाकारांना बाजूला सारुन, श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे संगीतमय कार्यक्रम भाजप सरकारने गोव्याबाहेरील कलाकारांना दिले. हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्वयंपूर्ण गोवा आहे का?

कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे गोव्यातील कलाकारांना संधी कधी देणार? असा सवाल गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे समाजमाध्यम प्रमुख दिव्या कुमार यांनी केला आहे.

श्रीराम मंदिर उद्घाटना निमीत्त आयोजित तीन दिवसीय उत्सवाचा भाग म्हणून काल रवींद्र भवन, मडगाव येथे आयोजित संगीत मैफलीत गोव्याबाहेरील कलाकारांच्या कार्यक्रमानवर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. सदर कलाकारांची मैफल रवींद्र भवन, वास्को आणि गोव्यातील इतर काही ठिकाणी होणार आहे.

गोव्यातील गायक आणि संगीतकारांना कार्यक्रमाची संधी का दिली गेली नाही? भाजप गोव्यातील कलाकारांसोबत "कमिशन डील" सेट करू शकत नाही म्हणून का? असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष दिव्या कुमार यांनी केला.

मडगावाच्या रवींद्र भवनातील तीन दिवसीय कार्यक्रमाचा अंदाजे खर्च 1.25 कोटी होता. मडगाव आणि फातोर्डा येथील विविध मंदिरात मडगावचे आमदार व फातोर्डाचे माजी आमदार यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा खर्च सदर खर्चातूनच भागविण्याचा त्या दोघांचा डाव होता.

सरकारी पैशाने आपली पोळी भाजून घेण्याचा मडगावचे आमदार व फातोर्डाचे माजी आमदार प्रयत्न करीत होते, असा गौप्यस्फोट दिव्या कुमार यांनी केला.

आम्ही प्रत्येक कार्यक्रमावर आणि विशेषतः खर्चावर बारीक लक्ष ठेवून आहोत. आमचे कार्यकर्ते प्रत्येक गोष्टीचे चित्रीकरण करुन पुरावे गोळी करत आहेत जेणेकरुन आम्ही सदर कार्यक्रमासाठी खोटे दावे व बिले सादर करण्याचा व रक्कम लाटण्याच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश करू शकू, असे दिव्या कुमार म्हणाले.

भाजपच्या खोट्या प्रचारात गोमंतकीयांनी वाहून जाऊ नये. श्रीरामाच्या नावाचा वापर करून आपली तिजोरी भरण्याचा डाव काहीजण करीत आहेत. गोमंतकीयांनी अशा संधीसाधूपासुन सावध राहणे गरजेचे आहे, असे दिव्या कुमार म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT