Manikrao Thakare Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'काँग्रेस पक्ष युतीचा धर्म पाळणार'! माणिकराव ठाकरेंचे प्रतिपादन; भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी घेणार निर्णय

Manikrao Thakare: भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी काँग्रेस पक्ष युतीचा धर्म पाळणार असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे गोवा प्रदेश काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: गोव्यातून भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी काँग्रेस पक्ष युतीचा धर्म पाळणार असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे गोवा प्रदेश काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्व क्षेत्रांत अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. येणाऱ्या पोटनिवडणुका व महापालिका निवडणुकांत भाजपचा पराभव होईल, असा दावा त्यांनी केला.

वास्को येथील मुंडवेल वाडे येथे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्या काँग्रेस कार्यालयाचे उद्‍घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, खासदार कॅ. विरियातो फर्नांडीस यांसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमित पाटकर, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, सावियो डिसिल्वा, प्रतीक्षा खलप, अर्चित नाईक, नितीन चोपडेकर, विठू मोरजकर, सिध्देश कलंगुटकर, श्रध्दा कलंगुटकर, नियाजी शेख, नजिर खान, नगरसेविका प्रिया राऊत, उलारिको रॉड्रिगीस, धनपाल स्वामी, आगुस्त डिकोस्टा, वसंत नाईक, पिटर डिसोझा, तुषार नाईक, स्नेहा फोंडेकर, उर्मिला साळगावकर, दर्शन राऊत, सुदाम नाईक व काँग्रेसचे पदाधिकारी तसेच वास्कोतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.

आंतकवादी म्हणने चुकीचे : पाटकर

मीराबाग बंधाऱ्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आतंकवादी म्हणणे चुकीचे आहे. भाजप सरकारकडून आंदोलकांवर केलेली ही टीका योग्य नाही. भाजप सरकारला आंदोलनकर्ते नक्कीच धडा शिकवतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT