Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, चिट्टी बाबू घंटावर कारवाई कधी? काँग्रेसचा सरकारला सवाल

Chitty Babu Ghanta: चिट्टी बाबू घंटा याच्याविरुद्ध तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: चिट्टी बाबू घंटा याच्याविरुद्ध तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. चिट्टी बाबू घंटा याचे भाजपच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांबरोबर संबंध असल्याने त्याच्याविरुद्ध कोणतीही पावले उचलली जात नाहीत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते ॲड. अमित पालेकर यांनी केला. काँग्रेस भवनात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी समील वळवईकर आणि महेश म्हांबरे उपस्थित होते.

पालेकर म्हणाले, घंटा यांचे राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याने त्याने बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्यांचा वापर पर्यटन खात्यातील निविदा भरण्यासाठी केला होता. २०२१-२२ मध्ये तो भ्रष्टाचारी असल्याचे सरकारला माहीत असतानाही त्याच्याविरुद्ध कारवाई झाली नाही. त्याने कॅसिनोला साहित्य पुरवठा करणाऱ्यांची फसवणूक केली आहे.

त्या पुरवठादारांचे लाखो रुपये अडकले आहेत. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो दोना पावला येथे हॉटेल चालवतो, तरीही त्याच्याविरुद्ध कारवाई का करण्यात येत नाही? राज्य सरकारकडून त्याला संरक्षण का दिले जात आहे, असा सवालही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, या चिट्टी बाबू घंटा याने गोव्यात आपले कॅसिनो आहेत, असे सांगून हैदराबाद येथेही अनेकांना टोपी घातल्याची माहिती समोर आली आहे. सहा-सहा बाऊन्सर घेऊन हा चिट्टी बाबू घंटा फिरतो. तो भाजपच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतो.

त्यामुळे त्याला कोण वाचवू पाहत आहे, असा सवालही त्यांनी केला. चिट्टी बाबू घंटा याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असतानाही त्याला कॅसिनोसाठी परवाना कसा दिला गेला, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT