सरकारच्या या योजनेचा फायदा सत्तरीतील ग्रामीण लोकांना होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: सत्तरीत कोविड योजनेच्‍या अर्जांवरून गोंधळ

सत्तरीतील काही पंचायत सचिव अशा अर्जावर आपला शेरा मारण्‍यास टाळाटाळ करीत असल्‍याने जनतेला त्‍याचा त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

पर्ये: राज्‍य सरकारने कोविड (Covid-19) काळात रोजगार (Employment) हरवलेल्या लहान व्यावसायिक, पारंपरिक व्‍यावसायिक, मोटारसायकल पायलट, रिक्षा, वाहन चालक अशा 69 प्रकारच्या अल्प आणि असंघटित क्षेत्रातील व्यावसायिकांना 5 हजार रुपयांची एकवेळ आधारभूत मदत (Basic help) देण्याची योजना सुरू केली खरी, पण त्याची अंमलबजावणी प्रक्रिया व्यवस्थित नसल्याने सरकारच्या या योजनेचा (Plan) फायदा सत्तरीतील ग्रामीण लोकांना होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

समाज कल्याण खात्यातर्फे ही योजना सुरू केल्यावर त्याचे छापील अर्ज पणजीतील कार्यालयात आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध केले होते. पण, काही अवघ्या दिवसांतच हे अर्ज संपल्याने सरकारने इंटरनेटवरून अर्ज डाउनलोड करून भरावे, असे जाहीर केले. पूर्ण भरलेल्या अर्जावर त्या पंचायत क्षेत्रातील सचिव यांची पडताळणी करून अर्ज मान्य करावे. पंचायतीने मान्य केलेले अर्ज नंतर समाज कल्याण खात्यात सुपूर्द करावे, असे मुख्यमंत्रांनी जाहीर केले होते. त्याला अनुसरून सत्तरीतील ग्रामीण भागातील पात्र लोकांनी असे अर्ज इंटरनेटवरून काढून ते पंचायत सचिवांकडे मान्यतेसाठी नेत आहेत. पण, सत्तरीतील काही पंचायत सचिव अशा अर्जावर आपला शेरा मारण्‍यास टाळाटाळ करीत असल्‍याने जनतेला त्‍याचा त्रास सहन करावा लागत आहे.

लाभार्थ्यांना या योजनेचे अर्ज उपलब्ध होत नसल्याने त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बरीच मंडळी वाळपईतील उपजिल्हाधिकारी कार्यालयात हे अर्ज मिळवण्यासाठी फेऱ्या मारताना दिसतात. पण, कार्यालयात गेल्यावर अर्ज संपले असे त्यांना सांगतात. काही वेळा त्यांना इंटरनेटवरून अर्ज काढा असेही सांगतात.

या योजनेबद्दल समाज कल्याण खात्यातर्फे आम्हाला कोणतीही लेखी माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे या अर्जावर आम्ही काय करावे, याबद्दल आम्हाला स्पष्टता नाही. इंटरनेटवरून काढलेल्या अर्जावर कोणताही शिक्का असत नाही. त्यामुळे हे अर्ज आम्ही कसे काय स्‍वीकारणार.

-दाऊद सय्‍यद, केरी-सत्तरी सरपंच

वाळपई कार्यालयात कोविड आधारभूत योजनेचे 500 अर्ज आले होते. मात्र, ते काही दिवसांतच संपले. सरकारने आता ऑनलाईन अर्ज काढून पंचायत सचिवांकडून मान्य करून घ्यावे, असे जाहीर केले आहे. तसेच ही योजना राजपत्रित झाली असून त्यात पंचायत सचिवांना त्याला मान्यतेचे अधिकार दिले आहेत. तेव्हा सचिवांना कोणत्याही लिखित आदेशाची गरज नाही.

- राजेश आजगावकर, सत्तरीचे उपजिल्‍हाधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

SCROLL FOR NEXT