Comunidade Land 
गोवा

Comunidade Land: ‘कोमुनिदाद’ कायद्यातही बदल हवेत

नितीन जमादार ः ‘कोड ऑफ कोमुनिदाद विथ फूल टेक्स्ट जजमेंट्स’चे प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

Comunidade Land जमिनींच्या सामुदायिक मालकीची संकल्पना आणि संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गोव्यातील कोमूनिदाद संस्था गोव्याच्या वारशाचा एक भाग आहेत. या संस्था आणि त्यांच्या मालमत्तेचे अंमलबजावणी संस्थांनी काटेकोरपणे नियमन करणे आवश्यक आहे.

कोमुनिदाद संस्थांचे नियमन करणाऱ्या कायद्यातही आवश्यकतेनुसार बदल करणे आवश्यक आहे, ज्यानुसार या संस्थांच्या मालमत्तांचा सार्वजनिक कारणासाठी वापर केला जातो, असे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश आणि वकील यांच्या उपस्थितीत ॲड.शशिकांत जोशी यांनी संकलित केलेल्या ‘कोड ऑफ कोमुनिदाद विथ फूल टेक्स्ट जजमेंट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन उच्च न्यायालय संकुलात पर्वरी येथे करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

न्यायमूर्ती महेश सोनक, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती भरत पी. ​​देशपांडे, न्यायमूर्ती एन.ए.ब्रिट्टो (निवृत्त), महाधिवक्ता देविदास पांगम आणि हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष झिलमन कोएल्हो परेरा यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन झाले.

सरन्यायाधीशांनी जोशी यांच्या कार्याचे कौतुक करून हे पुस्तक न्यायाधीश, वकील तसेच समाजाला उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले.

एजी देविदास पांगम यांनी कोमूनिदादची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करून कोमुनिदाद संस्था जतन करण्यासाठी कठोर नियमन करण्याची गरज व्यक्त केली. जोशी यांनी जनहितासाठी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

न्यायमूर्ती महेश सोनक यांनी सांगितले की, कोमूनिदाद संस्थांनी ग्रामसमाजाच्या हितासाठी जमिनी धारण केल्या आहेत. कोमूनिदादच्या जमिनी खाजगी फायद्यासाठी विकल्या जाणार नाहीत याची काळजी घेणे व्यवस्थापकीय समितीवर बंधनकारक आहे. बार असोसिएशनचे सचिव गौरीश अग्नि यांनी सूत्रसंचालन केले.

कोमुनिदादची 35 हजार एकर जमीन पडून

लेखक ॲड. शशिकांत जोशी यांनी कोमुनिदादचा कायदा आणि त्यातील कमतरता स्पष्ट केल्या. राज्यातील २२३ कोमूनिदादपैकी सुमारे ४३ निवडून आलेल्या समित्या नसल्यामुळे त्या निकामी झाल्या आहेत. कोमूनिदादकडे अंदाजे ३५,००० एकर जमिनीचा मोठा भाग आहे जो कोणत्याही प्रभावी वापराशिवाय पडून आहे.

कोमूनिदादच्या मालकीच्या या जमिनींचा संस्थात्मक हेतूसाठी वापर केल्याने कोमुनिदादला महसूल आणि त्यांच्या सदस्यांना (जोनोरिओस) उत्पन्न मिळू शकते. कोमूनिदाद मालमत्तेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचेही लेखकाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT